Home Breaking News साकळी येथे शिक्षणासाठी बाहेरगावाहुन येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीचा एकाने रस्त्यात केला विनयभंग

साकळी येथे शिक्षणासाठी बाहेरगावाहुन येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीचा एकाने रस्त्यात केला विनयभंग

641

 

यावल : ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथे बाहेर गावातुन शिक्षणा साठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा गावातील एका तरुणाने रस्ता अडवला व त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला.

याप्रकरणी साकळी येथील येथील त्या विद्यार्थीनींची छेडखानी करणाऱ्या युवका विरुध्द विनयभंगासह बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक ( पोक्सो) कायद्यान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यावल तालुक्यातील किनगाव येथून साकळी येथे एका माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी एसटी बस व्दारे ये – जा करतात बुधवारी काही विद्यार्थिनी एसटी बसने फाट्यावर उतरून साकळी फाट्या पासुन गावात पायी जात असताना साकळी गावातील आबा उर्फ दीपक वसंत मराठे याने त्यांचा रस्ता अडवत एका अल्पवयीन विद्यार्थीनींच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे, कृत्य केले घाबरलेल्या विद्यार्थीनींनी हा प्रकार आपल्या शाळेतील शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी त्वरीत या संदर्भातील पालकांना माहिती दिली.

विद्यार्थीनींच्या पालकांनी धाव घेत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा २०१२ पोस्को अन्वये आबा उर्फ दीपक वसंत मराठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, हवालदार सिकंदर तडवी हे करीत आहे. या छेडखानी गुन्ह्यतील संशयीत आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Previous articleशेगावात शुक्रवारी “भारतीय संस्कृतीचे जतन प्रत्येकाची *जबाबदारी” विषयावर अविनाशभारतींचे जाहीर व्याख्यान
Next articleमुंबई च्या सेबी कार्यालयावर जालन्यातुन मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना घेऊन जाणार—-गजानन पाटील भांडवले.