Home जालना मुंबई च्या सेबी कार्यालयावर जालन्यातुन मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना घेऊन जाणार—-गजानन पाटील भांडवले.

मुंबई च्या सेबी कार्यालयावर जालन्यातुन मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना घेऊन जाणार—-गजानन पाटील भांडवले.

647

 

प्रतिनिधी:(जालना)शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पार्टी च्या वतीने. दि,23 जानेवारी 2023 ला 11,00 वाजता मुंबईच्या बांद्रा कुर्ला येथील सेबीच्या कार्यलय समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.

त्यासाठी दि 22 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 9, वाजता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जालना रेल्वे स्टेशन ला येणे,
कारण दि, 09/01/2023 ला आपण शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष.. अनिल भाऊ घनवट,, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष.ललित पाटील बाहळे. यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हातुन मागणी चे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी ला दिले होते त्याचवेळी आपण जालना जिल्ह्यातुन दिले होते.

 

या सर्व मागण्याची दखल न घेतल्या मुळे मुबंई च्या सेबी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.
आपल्या मागण्या तरी काय आहेत .. की तुम्ही जे सेबी कार्यालया मार्फत दि, 20 डिसेंबर 2022 ला वायदे बाजारावरीला बंदी ला एका वर्षांची मुदत वाढ दिली ती तात्काळ उटविणे नबरं एक….. नंबर दोन
कापूस सोयाबीन व इतर सात शेती मालावरील वायदे बाजारात जि बंदी घातल्यामुळे शेती मालाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली याचे कारण म्हणजे सरकार चे धोरण ते धोरण तात्काळ बदलविण्यात यावे.

नंबर तिन तुम्ही जे सोयाबीन पेंड व डि ,ओ, सी, व कापसाचे सुत आयात करायचे धोरण राबवले ते धोरण तात्काळ बंद करण्यात यावे.

या सर्व आसेचे पत्र देवुन सुध्दा केंद्र सरकारने व राज्य सरकारने कुठलीच दखल न घेतल्या मुळे आता आम्ही सेबी कार्यालया वर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.

व जे केंद्र सरकारने शेतीमालाचे भाव दुप्पट करु आहे आश्वासन दिले होते ते पुर्ण केले नाही तेचा जवाब विचारणार आहोत.
तरी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांने मोठ्या संख्येने उपस्थित राहवे आहे आवाहन मी जालना जिल्हचा अध्यक्ष म्हणून गजानन पाटील भांडवले विनंती करीत आहोत.

Previous articleसाकळी येथे शिक्षणासाठी बाहेरगावाहुन येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीचा एकाने रस्त्यात केला विनयभंग
Next articleविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी समस्तआरोपींना अटक करा नातेवाईकांची मागणी