Home Breaking News सेजगाव येथे शिबिरा दरम्यान NSS ची मतदान जनजागृती रैली रैली ने ग्रामस्थाचे...

सेजगाव येथे शिबिरा दरम्यान NSS ची मतदान जनजागृती रैली रैली ने ग्रामस्थाचे लक्ष वेधले

263

 

गोंदिया:- मतदान जनजागृतीसाठी एन.एम.डी महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजना व जि.प वरीष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रासेयो निवासी शिबिर दरम्यान सेजगाव येथे २०जानेवारी रोजी जनजागृती रॅली काढली.

यावेळी उपसरपंच प्रमोद पटले,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बबन मेश्राम,शिबिर प्रमुख डॉ.अश्विनी दलाल,प्रा.रवी रहांगडाले,प्रा.अर्चना अंबुले,मुख्याध्यापक फाल्गुन कावळे,गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते.

म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.

मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सेजगाव येथे भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.असल्याचे डॉ.बबन मेश्राम यांनी गावकऱ्यांना रैली दरम्यान मार्गदर्शनातून समजावून सांगितले.

या जनजागृती रॅलीने गावाच्या ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. विविध घोषण वाक्य असलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी वरीष्ठ प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत चे सदस्य सहभागी झाले होते.

Previous article६०वर्ष वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या
Next articleयावल पंचायत समितीव्दारे झालेल्या विविध कामांची चौकशी व्हावी या मागणीसाठी निळे निशाण संघटने आमरण उपोषण सुरू