Home जालना रामनगर युनियन बँकेच्या नाना तऱ्हा,नागरीकांच्या नुसत्याच येरझरा- तुकाराम राठोड

रामनगर युनियन बँकेच्या नाना तऱ्हा,नागरीकांच्या नुसत्याच येरझरा- तुकाराम राठोड

116

—————————————-
रामनगर(वार्ताहर)युनियन बँक रामनगर शाखेच्या गचाळ कारभाराचा फटका रामनगरसह परिसरातील तब्बल तीस ते चाळीस गावातील नागरिकांना बसत आहे.

अगदी लहानात-लहान काम घेऊन देखील बँकेत गेले तरी ते देखील एक दिवसात होत नाही

.त्यासाठी नागरिकांना किमान चार ते पाच चकरा बँकेत माराव्या लागतात.बँकेतील कर्मचाऱ्यांच्या चालढकल वृत्तीला नागरिक कंटाळले असून,अनेकांनी बँकेतील आपली खाती बंद करून इतर बँकेत खाती उघडली आहेत.तसेच बँक कर्मचारी यांनी नागरीकांच्या सेवेसाठी तत्पर राहणे गरजेचे असताना.दुपारी चार वाजताच बँकेचे गेट बंद केले जाते.

त्यानंतर कुणालाही बँकेत प्रवेश दिला जात नाही.खुर्चीचा अमरपट्टा घेऊन आल्यासारखे कर्मचाऱ्यांच्या वागण्याला नागरिक कंटाळले आहेत.

सध्या एमपीएससी मार्फत अनेक जागांच्या जाहिराती निघाल्या आहेत.तसेच राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया देखील सुरू आहे.अनेक विद्यार्थ्यांना यासाठी बँकेच्या पासबुक ची आवश्यकता भासते.मात्र बँक कर्मचारी कुणालाही पास बुक उपलब्ध करून देत नाही.तसेच त्यांना ऑनलाईन एप्लिकेशन्स वरून पासबुक काढण्यास सांगितले जाते.मात्र असे पासबुक कुठेही ग्राह्य धरले जात नाही.हे कर्मचाऱ्यांना सांगणार कोण हाच खरा प्रश्न आहे.अनेक शेतकऱ्यांचे कर्ज थकित आहेत.

त्या शेतकऱ्यांची खाती बँकेने फ्रिज केले आहेत.त्यातली एक रुपया देखील सबंधित शेतकऱ्यांना काढता येत नाही.शासन स्तरावरून असे कुठलेही आदेश नसताना बँक प्रसासशन शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे.अनेक शेतकऱ्यांनी तडजोड करून आपली कर्ज खाती नील केली आहेत.ते बेबाकी मागायला गेल्यास उडवा- उडविची उत्तरे दिली जातात.

—————————————-
बँक अधिकाऱ्यांनी घेतली दखल
—————————————-
बँकेतील कर्मचारी वर्गाच्या वर्तनाला सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून बँकेच्या कारभाराविषयी सामन्यामध्ये तीव्र भावना व्यक्त केली जात आहेत.बँक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कार्यपद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

तरच नागरिकांचा रोष कमी होण्यास मदत होईल.अन्यथा लोकांच्या भावनांचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्चित.

प्रतिक्रिया:

रामनगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याच्या किंवा खातेदाराच्या अनुदानाचे पैसे तसेच तहसील मधून आलेल्या श्रावण बाळ,निराधार,अपंग सेवा योजनेतील लाभार्थ्याची खात्यावरील पैसे देण्यास टाळाटाळ करतात.कर्ज असल्यामुळे बचत खात्याला होल्ड लावतात.

मयत झालेल्या लाभार्थ्याचे पैसे काढण्यासाठी चार-पाच बाँड मागवतात.शेतकऱ्यांना विनाकारण चकरा मारायला लावतात.यामुळे त्यांचा आर्थिक खर्च होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.आज या उद्या असे कारणे सांगून कर्मचारी वेळ काढूपणा करत असून,त्यांच्या या वृत्तीला जरब बसवण्यासाठी प्रसानानाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

तुकाराम हरिचंद राठोड
जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी जालना.

Previous articleयावल पंचायत समितीव्दारे झालेल्या विविध कामांची चौकशी व्हावी या मागणीसाठी निळे निशाण संघटने आमरण उपोषण सुरू
Next articleभारताच्या प्रगतीसाठी म. गांधीजी यांच्या विचाराची व धोरणाची आवश्यकता मा० नगराध्यक्ष कासमभाई गवळी