Home बुलढाणा भारताच्या प्रगतीसाठी म. गांधीजी यांच्या विचाराची व धोरणाची आवश्यकता मा० नगराध्यक्ष कासमभाई...

भारताच्या प्रगतीसाठी म. गांधीजी यांच्या विचाराची व धोरणाची आवश्यकता मा० नगराध्यक्ष कासमभाई गवळी

184

 

इस्माईल शेख शेगाव

आज दि. 30 जानेवारीला हुतात्मा दिना निमित्त कॉंग्रेसच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी मा. नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी विचार मांडले.

आज भारत देश त्या अस्थिर अश्या परिस्थितीमधून जात आहे. ही परिस्थिती स्थिर करण्यासाठी व भारताच्या प्रगतीसाठी म. गांधीजी यांच्या विचाराची व त्यांच्या धोरणाची नितांत आवश्यकता आहे.

यावेळी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रतिनिधी प्रा. सतीश ताजने यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला बु. जि. महिला काँ.च्या उपाध्यक्ष लंबे ताई, मेहकर शहर महिला कॉ. च्या अध्यक्षा विमल माने मा. गटनेते अलिमभाई, मा. नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे पदधिकारी उपस्थित होते.

तसेच यावेळी मा कासम भाई गवळी यांनी पदविधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेरवार धिरज लिंगाडे यांना निवडून आणा. मा. नगराध्यक्ष कासमभाई गवळी पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धिरज रामभाऊ लिंगाडे यांना पसंती क्र. १ चे मत देऊन विजयी करावे असे आवाहन मा. नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी केले.

मेहकर येथील जि. प. हायस्कूल येथील मतदान बुथावर पदवीधर मतदारांना एकत्र करून व सर्वांना सोबत नेऊन लिंगाडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी कांग्रेसचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक व पदवीधर मतदार बंधु भगिनी सोबत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र माने यांनी केले तर आभारप्रदर्शन ससाणे यांनी केले.

Previous articleरामनगर युनियन बँकेच्या नाना तऱ्हा,नागरीकांच्या नुसत्याच येरझरा- तुकाराम राठोड
Next articleरोहयो अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसीय काम बना आंदोलन यावल तालुका यावल येथील पंचायत समिती आवारामध्ये