Home जळगाव रोहयो अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसीय काम बना आंदोलन यावल तालुका...

रोहयो अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसीय काम बना आंदोलन यावल तालुका यावल येथील पंचायत समिती आवारामध्ये

401

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

असिस्टंट प्रोग्रॅम मॅनेजर टेक्निकल ऑफिसर डाटा एन्ट्री ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक यांचे एकदिवसीय राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात आले.

रोहयो ही योजना 2005 पासून महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरात राबविले जाते याची जननी ही महाराष्ट्र राज्य असून सुद्धा तटपुंज मानधनावर कर्मचारी व रोजगार सेवक काम करीत आहे जेव्हा की केंद्र सरकारच्या 264 विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत नियमित व अखंडपणे हे कर्मचारी व ग्राम रोजगार सेवक हे चौघं घटक पोहोचविण्याचे काम करीत आहे.

राज्यामध्ये रोहयोच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे शेतकरी शेतमजूर भूमीहीन अशा विविध प्रकारच्या घटकांना विविध योजनांची अंमलबजावणी करून शासनास मोठ्या प्रमाणे मदत करणे तरीही आज या चारही आधारस्तंभांना केंद्र शासन व राज्य शासन आधार देत नाहीये देशातील इतर सात राज्यांमध्ये या चौघटकांना सन्मानपूर्वक पोटाला मिळेल एवढे मानधन किंवा मासिक वेतन देण्यात येते त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात मासिक वेतन देण्यात यावे यासाठी पुढील मागण्या मंजूर करण्यात याव्या.

1 मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे
2 पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे
3 रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्या
4 योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी
5 मध्यप्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरीची आम्ही देण्यात यावी

वरील प्रमाणे मागण्याची दखल न घेतल्यास उद्यापासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल सदर राब राज्यव्यापी आंदोलनात असिस्टंट प्रोग्रॅम मॅनेजर विशाल राऊत टेक्निकल ऑफिसर समाधान बोरसे ऑपरेटर किशोर कोळी जितेंद्र सोनवणे संतोष पाटील ग्राम रोजगार सेवक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे राज्य संघटक कुशाल पाटील तालुकाध्यक्ष दीपक कोळी उपाध्यक्ष अनिल वसीम पिंजारी सचिव सरफराज तडवी ,साहेबराव कोळी अनिल डाके, दिगंबर पाटील ,अरुण कोळी ,शरीफ तडवी, गणेश भालेराव, मेहरबान तडवी इत्यादी मोठ्या संख्येने मनरेगा कर्मचारी उपस्थित होते

Previous articleभारताच्या प्रगतीसाठी म. गांधीजी यांच्या विचाराची व धोरणाची आवश्यकता मा० नगराध्यक्ष कासमभाई गवळी
Next articleट्राम पोलियम राष्ट्रीय स्पर्धेत अजय पहुरकर यास सुवर्ण पदक