संग्रामपूर : काही महिन्याअगोदर लंपीच्या आजाराने संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये थैमान घातले होते.
यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या, खूप साऱ्या औषधी त्यांना दिल्या, जनावरांना वाचवण्यासाठी खूप खर्च केला,
परंतु त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. परिणामी बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरे हे लंपीच्या आजाराने मृत्युमुखी पडली. शेतकऱ्यांकडे शेतीच्या व्यवसायाला जोड धंदा म्हणून जनावर पाळली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने गाय, म्हैस, बैल हे आहेत.
परंतु लंपीच्या आजारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मृत्युमुखी पडली. त्याचा खूप मोठा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते रविकांतजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या जलसमाधी आंदोलनामध्ये लंपी च्या आजाराने मृत्युंमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत तात्काळ मिळावी ही प्रमुख मागणी होती.
ती मागणी सरकारने तात्काळ मंजूर करून पहिला हप्ता टाकला होता.परंतु गेल्या दोन महिन्यापासून दुसरा हप्ता हा अजूनही लाभार्थ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, दुष्काळामध्ये शेतीमाल हा मातीमोल झालेला आहे,
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणे फार गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब न करता लंपीच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई बँक खात्यात जमा करावी करिता तहसील कार्यालय संग्रामपूर मार्फत जिल्हाधीकारी साहेब बुलडाणा यांना स्वाभिमानीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, आशिष सावळे नयन इंगळे, श्रीकृष्ण मसूरकार, अर्जुन सपकाळ, राजेश उमरकर, प्रदीप उमरकर,समाधान मसूरकर भास्कर तांदळे, हे उपस्थित होते