Home Breaking News जालना जिल्हा सी.एस.सी.समन्वयकाकडून केली जाते गुत्तेदारी:

जालना जिल्हा सी.एस.सी.समन्वयकाकडून केली जाते गुत्तेदारी:

469

 

प्रतिनिधी:(जालना)जिल्ह्यातील सी.एस.सी.समन्वयकाची गुत्तेदारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

त्यात प्रामुख्याने आपल्या जवळच्या माणसांना जवळ धरून त्यांची सर्व प्रकारचे सी.एस.सी.ची कामे लवकर करून द्यायचे व इतर सी.एस.सी.व्हीएलई चे कामे करायचे नाही.

एखाद्या सी.एस.सी.व्हीएलई ने कामाचा पाठपुरावा केला असता,कामाबद्दल विचारणा केली असता त्याला उद्धट शब्दात बोलणे,मानसिक त्रास देणे,धमक्या देणे असले प्रकार जालना जिल्ह्यातील सी.एस.सी. जिल्हा समन्वयक यांच्याकडून घडत आहेत.

जालना जिल्हा सी.एस.सी. समन्वयक श्री.तुकाराम बजरंग लोदवाल यांच्याकडून नवीन सी.एस.सी.व्हीएलई रेजिस्ट्रेशन सेंटर असताना सुद्धा पैसे घेऊन अप्रोव्ह केले जातात.

तसेच सर्व प्रकारच्या सी.एस.सी.च्या सर्व्हिसमध्ये सक्रिय असणाऱ्या सी.एस.सी.व्हीएलई चे कामे 6 महिण्यापेक्षा जास्त दिवस होऊन पण काम केले जात नाही. एवढेच नव्हे तर त्या सी.एस.सी.व्हीएलई ला वारंवार टाळाटाळ करत असून त्यांना मानसिक त्रास सुद्धा सी.एस.सी. समन्वयक यांच्याकडून होत आहे.

त्याऐवजी सी.एस.सी. जिल्हा समन्वयक हे आपल्या गुत्तेदारी पद्धतीने काम करणाऱ्या त्यांच्या माणसांना च सर्व कामे दिली जातात, त्यांचीच सर्व कामे केली जातात.

सध्याचे सी.एस.सी.जिल्हा समन्वयक श्री. तुकाराम बजरंग लोदवाल हे एक सी.एस.सी व्हीएलई असताना सुद्धा सी.एस.सी. जिल्हा समन्वयकचे काम करत आहेत.

अशा प्रकारे सी.एस.सी. मध्ये गुत्तेदारी पद्धतीने काम करणाऱ्या सी.एस.सी. जिल्हा समन्वयक श्री.तुकाराम बजरंग लोदवाल यांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी.

अशी मागणी सी.एस.सी.व्हीएलई कडून करण्यात येत आहे.

Previous articleशेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भुमीपुत्रांची तहसील कार्यालय वर धडक….!
Next articleसौ.अनिता निकम यांची जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड