Home Breaking News श्री संत रवीदास महाराज जयंती मोठ्या हर्ष उल्लासात साजरी

श्री संत रवीदास महाराज जयंती मोठ्या हर्ष उल्लासात साजरी

259

 

संग्रामपूर प्रतिनिधी। मन चंगा तो कटोती में गंगा हे ब्रीदवाक्य घेऊन श्री संत रविदास महाराज यांनी पूर्ण भारतभर कार्य केले अशा या महापुरुषाचे आज 5 फेब्रुवारी 2023रोजी तालुक्यातील विविध ठिकाणी जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली.

संग्रामपूर, वरवट बकाल, सोनाळा,टुनकी , पातुर्डा या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय टुनकी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुरेश भिकाजी लोणकर यांच्या हस्ते रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय टुनकी येथे सरपंच सुरेंद्र चौकट यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे विदर्भ प्रवक्ते, प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल गजानन निंबोळकार, भाजपाचे जिल्हा सदस्य डॉ गणेश दातीर, सरपंच सुरेंद्र चौकट, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन विणकर, माजी सरपंच जीवन लोणकर अमोल निंबोळकार ,गजानन राजाराम निंबोळकार, श्रीकृष्ण निंबोळकार ,गणेश निंबोळकर, गोपाल निंबोळकार, सुभाष बावस्कर, भाजपा सोनाळा सर्कल प्रमुख मुरलीधर चोरे, ग्रामपंचायत लिपिक विठ्ठल लोणकर, मनोहर वाघ, श्याम खंडागळे, यासह बहुसंख्य समाजबांधव गावांमधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Previous articleदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.विद्यार्थ्यांची बुध्दीगुणांक चाचणी व निदान शिबिर संपन्न.
Next articleबाळपुर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ