Home Breaking News बाळपुर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ

बाळपुर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ

390

 

दिनांक 6/ 2/2023 रोजी ठाणेदार अनंतराव वडतकर साहेब यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती

मिळाली की ग्राम नया अंदुरा कडून हातरून गावाकडे रोडने एक इसम त्याचे मोटरसायकलवर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणार आहे अशा माहितीवरून तात्काळ पथक रवाना करून नाकाबंदी केली असता.

आरोपी विकास ओंकार मुंडाले वय 21 वर्षे राहणार मांजरी तालुका बाळापूर जिल्हा अकोला हा अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना मिळून आला त्याचे जवळून देशी दारू सखु संत्रा टांगो प्रीमियमचे 180 एम एल चे 144 कॉटर ज्याची किंमत 10,080/- व एक मोटरसायकल हिरो कंपनीची एचएफ डीलक्स लाल रंगाची जी चा क्रमांक mh.30.BG.0968 किंमत अंदाजे 50000/- असा एकूण 60,080/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वरील आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन उरळ येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यवाही करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडदकार, पोलीस अंमलदार संतोष भोजने,रवी हिंगणे, शैलेश घुगे, नंदकिशोर तांदळे

Previous articleश्री संत रवीदास महाराज जयंती मोठ्या हर्ष उल्लासात साजरी
Next articleसातोद थकीत बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना पिता पुत्रांकडुन मारहाण दोघांना पोलिसांनी केली अटक