Home Breaking News सातोद थकीत बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना पिता पुत्रांकडुन मारहाण दोघांना...

सातोद थकीत बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना पिता पुत्रांकडुन मारहाण दोघांना पोलिसांनी केली अटक

520

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील I सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी वीज कर्मचारी गेले असता त्याचा राग येऊन पिता-पुत्राने विज कर्मचाऱ्यासह सोबतच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून येथील पोलीस ठाण्यात दोघ पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की , तालुक्यातील सातोद येथील राहणारे सुनील भास्कर धांडे यांचे कडे मंगळवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीचे थकबाकी असलेले विजबिल मागणीसाठी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश प्रल्हाद बारी राहणार यावल व सोबतचे कर्मचारी गिरीश सतीश चौधरी हे सुनील धांडे यांचे कडे थकीत विजबिल मागणीसाठी गेले असता.

व वरिष्ठाच्या आदेशाने त्यांना भरण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन सुनील धांडे व योगेश सुनील धांडे या दोघांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

योगेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलीस ठाण्यात पिता-पुत्रा विरुद्ध भादवी कलम ३५३, ३३२, ३२३,५०४,५०६,व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून , पिता पुत्राला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Previous articleबाळपुर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ
Next articleपत्रकार व वृत्तपत्र वितरण वाहनाला समृध्दी महामार्ग मोफत करा-विकासकुमार बागडी