Home Breaking News मानाकी अंधेरा बहोत है,पर दिया लगाना कहा मना है..?आझाद हिंद महिला संघटनेच्या...

मानाकी अंधेरा बहोत है,पर दिया लगाना कहा मना है..?आझाद हिंद महिला संघटनेच्या आक्रोश निषेध मोर्चातील मागण्यांच्या पूर्ततेला सुरुवात..

143

 

अवैध धंद्यांना लगाम लावण्याचे पोलीस महानिरीक्षकांचे आदेश.

तर काही ठिकाणी अवैध व्यवसांयांवर धाडी टाकायला सुरुवात..

बुलढाणा:
अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी नूकताच जिल्ह्यातील प्रत्येक पोस्टेचा गोपनीय आढावा घेवून अवैध धंदे बंद करण्याचे नुकतेच जिल्हा दौऱ्यावर असताना सर्वांसमक्ष बैठकीत आदेशित केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने 23 जानेवारी पासून राज्यभर आक्रोश निषेध मोर्चांना सुरुवात केलेली आहे.

तर नुकतीच मंत्रालयात मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे मूख्य सचिवालय, पोलीस महानिरीक्षकांची आझाद हिंदच्या शिष्टमंडळाने आकाश निषेध मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन सादर करत भेटही घेतली होती.
_देर आये दुरुस्त आये.._
बुलढाणा जिल्ह्याला,शहराला लागलेली अवैध धंद्याची कीड उघडून फेकण्यासाठी 1996 पासून 2023 पर्यंत एकमेव आझाद हिंदचे प्रामाणिक आंदोलन सुरूच आहे.

मग तत्कालीन पालकमंत्री यांच्या घरासमोर अवैध धंद्याचे दुकान सुरू करणे असो की रस्त्यावर मोर्चे काढणे असो आझाद हिंद अवैध धंद्यांच्या विरोधात मैदानातच उतरली आहे. एकीकडे कूणीच ब्र शब्द बोलत नसतांना आझाद हिंद ने प्रत्येक वेळी जीवाची बाजी लावून लढाई लढली आहे. या अनुषंगाने आझाद हिंद संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांच्यावर अनेक वेळा प्राण घातक हल्ला सुद्धा झालेला आहे. पण तरीही आझाद हिंदने न डगमगता आंदोलन सुरूच ठेवले.

परंतु सद्यस्थितीत शासन प्रशासनाने सहकार्य करीत अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी आदेशित केले आहे त्यामुळे मोठा संघर्ष टळला. करीता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांचे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनसह आझाद हिंद च्या वतीने जाहीर आभारही व्यक्त करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्हासह राज्यातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने सरकार विरोधात आक्रोश निषेध मोर्चांना २३ जानेवारी २०२३ देशगौरव नेताजी जयंती पासून राज्यभर सुरुवात केलेली आहे.

तर या अनुषंगाने मुख्यमंत्री ,गृहमंत्री, मुख्य सचिवालय यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन वास्तविक हकीकत त्यांच्यासमोर ठेवण्यात आली होती.
आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने व आझाद हिंद संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंद्यांची कीड उकडून फेकण्यासाठी सतत अविरत सत्तावीस वर्षापासूनचा संघर्ष आजही सुरूच आहे. विशेष म्हणजे अवैद्य धंद्यांच्या विरोधात एकमेव आझाद हिंदच रस्त्यावर उतरते. नाहीतर निवेदन देऊन , पत्रक बाजी करणारेही आपण सर्वजण जाणताच. परंतु निवेदन, मागणी

,आंदोलन केल्यानंतर मागणी पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्याची चिकाटी, धमक, क्षमता आझाद हिंदची खऱ्या अर्थाने ओळख आहे.
करिता बुलढाणा जिल्हा वासियांच्या असंख्य शुभेच्छा आणि कौतुकाची थाप आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांना आज मिळत आहे. परंतू आक्रोश निषेध मोर्चाच्या मुख्य समन्वयक तथा आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे यांनी बुलढाणा जिल्हा वासियांमुळेच अवैध धंदे बंद झाल्याची प्रथम प्रतिक्रिया एका पत्रकाद्वारे दिली आहे.

शासन,प्रशासन,अवैध व्यवसायीकांची मोठी शृंखला एका बाजूला असतांना सर्वसामान्य महिला, नागरिक आणि आझाद हिंद महिला संघटना काय करू शकते. याचा प्रत्यय नेहमीच बुलडाणा जिल्हा वासीयांनी अनुभवला आहे.पण परिस्थिती कशीही असो एक पाऊल आपल्या अधिकारासाठी टाकने महत्त्वाचे आहे. माना की अंधेरा बहुत है , लेकिन दिया लगाना कहा मना है. या पद्धतीने आझाद हिंद महिला संघटनेच्या चिवट लढ्याला अखेर यश मिळत आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

 

Previous articleउषा पानसरे म्हणजे आज वर महिला पत्रकारितेतिल ऊगवता-सुर्य,
Next articleनिंभोरा सरपंच यांनी केलं सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्तीतीत ग्राम सभेचे आयोजन