प्रतिनिधी अशोक भाकरे
अकोला पंचायत समिती अंतर्गत येणारी गट ग्राम पंचायत निंभोरा हे निवडणुकीपासून सतत चर्चेत राहणारं गाव झालं आहे. कारणही तसंच मागील 60 वर्षाची सत्ता परिवर्तन घडवून जनतेने शिवसेनेच्या तालुका प्रमुख प्रा नितीन सुभाषराव ताथोड यांच्या सुशिक्षित आणि दमदार नेतृत्वावर विश्वास ठेवून यांच्या ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी केलं.
तसेच सरपंच पदाच्या उमेदवाराला रेकॉर्ड मतांनी निवडून दिल. हाच लोकांचा विश्वास कायम ठेवून गाव विकास हेच ध्येय समोर ठेवून गावातील मुख्य समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न म्हणून लोकसहभाग महत्वाचा भाग म्हणून सरपंच यांनी पहिल्या ग्राम सभेचं आयोजन केले होते. निंभोरा येथील ही ग्राम सभा जिल्ह्यातील पहिली अशी आगडी वेगडी ग्राम सभा असेल ज्यात लोकांच्या ज्या विभागाच्या समस्या असतील त्यांचे निराकरण त्याच विभागाचे अधिकारी यांनी करवी.
अशी व्यवस्था सरपंच प्रा नितीन सुभाषराव ताथोड यांनी केली होती. एक प्रकरे ही ग्राम सभा म्हणजे जनतेचा ग्राम दरबाराच होता. सदर सभेला सर्व ग्राम पंचायत सदस्य,ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, रोजगार सेवक, ग्राम पंचायत ऑपरेट,आरोग्य सेविका, आशा सेविका, स्वस्त धान्य दुकानदार, पशु वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी,तलाठी, पोलीस पाटील, बिट जामदार, महिला बचत गटाच्या प्रमुख,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कृषी सहाय्यक, कृषी मित्र, तंटा मुक्ती अध्यक्ष,अंगणवाडी स्वयंपाकी यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
लोकांच्या तक्रारी लिहून घेतल्या व त्या सोडवण्याचा प्रयन्त करणार असल्याचे लोकांना सांगण्यात आले. रोजगार हमी,15 वित्त आयोग, दलित वस्ती,स्मशान भूमी विकास, शेतरस्ते, अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम,ग्राम पंचायत इमारतीच बांधकाम, नाला खोलीकरण, बंधारा बांधकाम, शाळा दुरुस्ती,इत्यादी महत्वाची कामे पंचायत समिती,जिल्हा परिषदच्या विभागांकडून मंजूर करून घेण्यासंदर्भात ग्राम सभेत चर्चा करून मंजुरात देण्यात आली. ग्रामसेवक अनंत वावगे यांनी गाव विकासासाठी घरकर आणि पाणिकर वेळेवर आणि नियमित भरण्याच्या सूचना लोकांना दिल्या.
आरोग्य सेविका संगीता टेलगोटे आणि कल्पना अवारे यांनी नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड विषयी महत्वाची माहिती सांगितली. स्वस्थ धान्य दुकानदार भास्कर ताथोड यांनी शासनाच्या नवीन आदेशाची माहिती देऊन रेशन स्वतः बंद करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कृषीच्या विविध योजना ची माहिती कृषी सहाय्यक प्रणित बंड आणि दिनेश डोंगरे यांनी दिली तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या समितीची (पोक्रा)शासन निर्णय नुसार ग्राम सभेत निवड केली. सोबतच बिट जामदार शमलाल शाहू यांच्या उपस्तीतीत तंटा मुक्त समितीची स्थापना करण्यात आली. शाळा मुख्याध्यापक चौधरी सर यांनी शाळेतील महत्वाच्या दुरुस्ती आणि आवश्यकता सांगितल्या.
सरपंच यांनी सर्व अधिकारी आणि जनतेचे ग्राम सभा यशस्वी होण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल आभार मानले आणि गाव विकासात अशीच साथ मिळत राहो ही अपेक्षा व्यक्त केली. सभेला जनतेचा भरघोस प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ग्राम सभेची प्रस्तावना ऑपरेट अमित देवर यांनी केली.
ग्राम सभेची सर्व व्यवस्था कर्मचारी नितीन देशमुख आणि पाणीपुरवठा कर्मचारी राजेश बोर्डे यांनी पहिली.