अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.
चामोर्शी:-पंचायत समिती चामोर्शीच्या वतीने तालुक्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व व्यवस्थापनातील शाळांसाठी दिनांक ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे शुभहस्ते करण्यात आले तर प्रदर्शनीचे अध्यक्ष कारमेल अकादमीचे
प्राचार्य फादर असस्टीन आलेनचेरी हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून दिलीप चलाख तालुका अध्यक्ष भाजपा,साईनाथ बुरांडे महामंत्री,सुरेश शहा जिल्हा अध्यक्ष,प्राचार्य श्याम रामटेके यशोधरा विद्यालय चामोर्शी, प्राचार्य आर.एस. ताराम शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी,अरविंद भांडेकर मुख्याध्यापक कृषक हायस्कूल चामोर्शी,हितेंद्र चांदेकर प्राचार्य जा कृ बोमनवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या चामोर्शी, शिवराम मोगरकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,प्रशांत नैताम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,श्रीमती एस एस गयाली मुख्याध्यापिका नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल विक्रमपूर, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के पंचायत समिती चामोर्शी,राणा सातपुते ज्येष्ठ भाग शिक्षण अधिकारी चामोर्शी,हिम्मतराव आभारे केंद्रप्रमुख चामोर्शी,अमरदीप चौधरी पर्यवेक्षक कारमेल अकॅडमी चामोर्शी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये चामोर्शी तालुक्यातील शाळांनी साहित्यासह उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारमेल अकादमीचे शिक्षक शेंडे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार गट साधन केंद्र चामोर्शीचे विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी मानले.
विज्ञान प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.