Home बुलढाणा पर्यटन नगरी लोणार सरोवर शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष…

पर्यटन नगरी लोणार सरोवर शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष…

230

 

लोणार – प्रणव वराडे

जगप्रसिद्ध पर्यटन नगरी लोणार शहरातील प्रमुख मार्ग बस स्टॅन्ड चौक, महात्मा बसवेश्वर चौक, मंठा बायपास यासह लोणार शहरातून गेलेला प्रमुख शेगाव पंढरपूर महामार्ग याच महामार्गावर बाजारपेठ व बसस्थानक असल्याने या महामार्गावरून बस स्थानकातून निघालेली.

एसटी बसेस, लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या, जड मालवाहतूक गाड्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून जात असतात एवढा महत्त्वाचा असलेला या रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे बिनधास्त बसलेली आढळत आहे. परंतु याकडे स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

या मोकाट जनावरांमुळे एखादा मोठा अपघात झाल्यास यास जबाबदार कोण राहणार हा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे सदर मोकाट जनावरे रस्त्यावरून हटवण्याचे साठी शासनाची कोणती यंत्रणा नाही का असा प्रश्न सुद्धा नागरिकांना व येणाऱ्या पर्यटकांना पडत असल्याचे चर्चा शहरात सुरू आहे.

मुख्य रस्त्यासह शहरातील गल्लोगल्ली मोकाट जनावरे फिरत आहे. पशुधना बरोबरच मोकाट कुत्र्यांची संख्या ही वाढलेली आहे. रात्री अपरात्री अनेक रस्त्यांवर, गल्लोगल्लीत एकटे जायचे असल्यास पुढे कुत्रे तर नाही ना असे भय नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहे. कारण असंख्य नागरिक, महिला, व लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

गल्लोगल्लीत लहान मुले घरासमोर खेळत असतात यावेळेस तेथे कुत्रे, डुक्कर व इतर मोकाट जनावरे येत असल्याने लहान मुलांना घरासमोर खेळणे सुद्धा धोकादायक झालेले आहे. काही कुत्रे तर अंगाला जखम असलेली, केस गळलेली व पिसाळलेली कुत्रे सुद्धा गलो गल्ली लहान मुले खेळतात त्या ठिकाणी येत आहेत.

एखादा पिसाळलेला किंवा अंगाला जखम असलेला कुत्रा लहान मुलास किंवा नागरिकास डसल्यास काय होऊ शकते याची कल्पना सुद्धा करता येत नाही. आज रोजी संपूर्ण लोणार शहरात जागो जागी मोकाट जनावरांचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे. या समस्येने लोणारकर अगदी मेटकुळीस आलेले आहे.

मोकाट जनावरांना पकडण्याची व दंडांची मोहीम राबविणे आवश्यक आहे नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे व कारवाईची भीती नसल्याने शहरातील मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी लोणार शहरातील रामनगर येथील दोन बालकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे लहान बालकांना दुखापत झाली असल्याकारणाने लोणार येथील विनायक मापारी यांनी नगर परिषदेला निवेदन दिले आहे.

की नगर परिषदेने मोकाट जनावरांचा मोकाट कुत्र्यांचा पंधरा दिवसात बंदोबस्त करावा अन्यथा लोणार शहरातील मोकाट व पिसाळलेले कुत्रे नगर परिषदेत जमा करण्यात येतील असा इशारा निवेदनात दिला आहे आता या समस्ये कडे नगर परिषद लक्ष देणार की मोकाट जनावरांमुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघणार याकडे शहरवासी यांचे लक्ष लागले आहे एवढे मात्र खरे

Previous articleविद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासोबतच देशसेवेसाठी उज्ज्वल वैज्ञानिक निर्माण करणे गरजेचे आहे–गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन.
Next article५ वर्षाअगोदर झालेला लोणार महोत्सव होईल काय? पर्यटकप्रेमी नागरिकांना लागली ओढ..