Home बुलढाणा ५ वर्षाअगोदर झालेला लोणार महोत्सव होईल काय? पर्यटकप्रेमी नागरिकांना लागली ओढ..

५ वर्षाअगोदर झालेला लोणार महोत्सव होईल काय? पर्यटकप्रेमी नागरिकांना लागली ओढ..

170

 

लोणार – प्रणव वराडे

जगप्रसिध्द लोणार सरोवराच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व नगर परीषदेच्या वतीने पर्यटन संकुलनाच्या बाजूला असलेल्या मैदानावर मार्च २०१७ मध्ये तीन दिवसीय लोणार महोत्सवाचे आयोजण करण्यात आले होते. तब्बल ५ वर्षानंतर परत पर्यटन प्रेमी नागरीकाना लोणार महोत्सव व्हावा अशी ओढ लागली आहे.

लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षात तो झालाही नसता. परंतू मार्च २०१७ मध्ये झालेल्या या लोणार महोत्सवावर शासनाच्या वतीने ५० लक्ष रुपये खर्च करण्यात आले होते. तीन दिवसीय राजकीय-सामाजीक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

होते. या महोत्सवाला नागरीकांनी भरभरून प्रतिसादही दिला हा महोत्सव धूमधडाक्यात साजराही मान्यवरांनी आपल्या भाषणातून हा महोत्सव दरवर्षी साजरा करण्यासाठी शासन दरबारी पाठपूरावा करु असे चालना देण्यासाठी या महोत्सवाचे आश्वासनही दिले होते. परंतु या आश्वासनाचा विसर खुद्द मान्यवरांना पडल्याचे दिसून येते.

एकीकडे सरोवर विकास आराखड्याअंतर्गत तब्बल ३६९ कोटी रुपायाचा निधी मंजूर करण्यात आला असताना सरोवर विकासाला चालना देण्यासाठी लोणार महोत्सवाचे आयोजनही करणे तितकेच महत्वाचे

मान्यवरांनी दरवर्षी लोणार महोत्सव घेण्यायासाठी शासन दरबारी पाठपुरावा झाला. करु असे आश्वासन दिले होते. पण हे आश्वासन महोत्सवा बरोबरच ईतीहास जमा जमा झाले आहे. तरी यावर्षी तरी लोणार महोत्सव व्हावा अशी ओढ पर्यटन प्रेमी नागरिकांना लागली आहे. एवढे मात्र खरे..!

Previous articleपर्यटन नगरी लोणार सरोवर शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष…
Next articleकोल्हापूर नंदवाळ येथे विठ्ठल रुक्मिणी व सत्यभामा यांचे पाषाणमूर्ती