यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे
येथील शहरात विस्तारित वसाहती मधीलश्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात भाविकांच्या उपस्थित पार पडला. येथील विरार नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात पहाटे पाच वाजता मूर्तीचा अभिषेक व आरती, लघु रुद्र याग पार पडले.
शहरातील श्री रेणुकादेवी मंदिरापासून मुख्य रस्त्याने श्रींच्या पादुकाची पालखी मंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. प्रा.डॉ. हेमंत येवले यांच्या हस्ते सपत्नीक पुजा करून पालखी पालखी मिरवणूकीस सवाद्य सुरवात झाली. प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून पुजा-अर्चा करण्यात आली.
मिरवणूकीत शहरातील बाल संस्कार विद्या मंदिर, सरदार वल्लभभाई पटेल स्कुल व सरस्वती विद्या मंदिर या तीन शाळेतील विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनीच्या झांज पथक, लेझीम पथक व दिंडी पथक आदींचा सहभाग होता . विद्यार्थी विद्यार्थिनींच्या रंगीबेरंगी पोशाख व विविध पथकाने शहरवासी यांचे लक्ष वेधून घेतले होते .
दुपारी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, सौ. छाया अतुल पाटील, तहसिलदार महेश पवार, मंदिर संस्थानचे अध्यक्ष आर. डी.पाटील यांच्या हस्ते श्रींची महाआरती झाली व त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते साडेबारा वाजेपासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात आले.
दुपारी दुर्गामाता भजनी मंडळ व लक्ष्मीनारायण भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी सात वाजता श्री ची आरती नंतर रात्री प्रा. मनोज महाराज पिंप्राळाकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला , दिवसभरात हजारो भाविकांनी स्त्रीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला संस्थानचे विश्वस्थ भाविकांनी परिश्रम घेतले.