Home जळगाव शालेय जिवणातच यशस्वी होण्याचा मार्ग मिळु शकतो – सचिन तडवी

शालेय जिवणातच यशस्वी होण्याचा मार्ग मिळु शकतो – सचिन तडवी

398

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

चुंचाळे येथे बारावीच्या विद्यार्थांना मोफत फाईल फोल्डर वाटप
प्रतिनिधी l चुंचाळे ता यावल
बालपणापासुन आपण शैक्षणिक पात्रता वाढवण्यात गुंतलेलो असतो,यातुन थेट नोकरी लागेपर्यंत सुटका होत नसते,यामुळे प्रत्येकाने आपल्या शालेय जिवणातच शैक्षणिक पातळी उंचावण्याचा चांगला प्रयत्न केला पाहीजे,

यातुनच आपणांस यशस्वी होण्याचा मार्ग सापडू शकतो.प्रत्येकाच्या आयुष्याला दहावी व बारावीचे वर्ष हे कलाटणी देणारे ठरत असते,यामुळे आपण प्रत्येकजण जास्त गुण कसे मिळवता येतील याकडे लक्ष देतो.सध्या स्पर्धेच्या युगात आपल्या अंगी फक्त शैक्षणिक पात्रता अंगी असुन चालत नसुन यासोबतच अनेक व्यावसायिकतेची जोड असणे आवश्यक असते.

असे मार्गदर्शन नायगाव येथिल सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्ते सचिन तडवी यांनी यावेळी केले.

यावल तालुक्यातील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना अमिर प्रतिष्ठान मोहरद कडून मोफत फाईल फोल्डर वाटप करण्यात आले.यावेळी श्री समर्थ वासुदेवबाबा अध्यात्मिक व शैक्षणिक ट्रस्ट चे संचालक आर के पाटील,विद्यालयाचे प्राचार्य व्ही जी तेली,सामाजिक कार्यकर्ते रमजान तडवी,किनगाव येथिल प्रमोद पाटील,ग्रामविकास अधिकारी अशरफ तडवी,अरविंद चौधरी,वसतीगृह अधिक्षक चंद्रकांत चौधरी,सुधीर चौधरी,प्रा शारदा चौधरी,प्रा राकेश अडकमोल,प्रा जमिला तडवी आदी उपस्थित होते.यापूर्वीही अमिर प्रतिष्ठान कडून मोफत अपेक्षित वाटप करण्यात आले होते.

दरम्यान प्राचार्य व्ही जी तेली यांनी विद्यालयातील मागील पार्श्वभूमी सांगुन आपल्या उज्वल यशासाठी आपल्याला फार दुर जावे लागत नसल्याचे सांगितले.सर्वकाही जवळच उपलब्ध होते,याचा आपण सर्वांनी लाभ घेतला पाहीजे असेही सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय गोसावी,आभार प्रशांत सोनवणे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका,कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Previous articleयावलला श्री गजानन महाराज प्रकट दिन शेकडो भाविकांच्या उपस्थित उत्साहात साजरा
Next articleमुलाची शेवटची भेट घेण्याची इच्छा राहिली अपुर्णच , विहीरीत उडी घेवून आत्महत्या