Home Breaking News मुलाची शेवटची भेट घेण्याची इच्छा राहिली अपुर्णच , विहीरीत उडी घेवून आत्महत्या

मुलाची शेवटची भेट घेण्याची इच्छा राहिली अपुर्णच , विहीरीत उडी घेवून आत्महत्या

620

 

यावल – प्रतिनिधी। विकी वानखेडे

आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छ मित्रांला बोलून दाखवत आदिवासी तरुणाने विहीरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आली आहे

आवेश गबू तडवी (वय-३०) रा. बिडगाव मोहरद ता. चोपडा ह.मु.यावल असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आवेश तडवी हा आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह वास्तव्य्या होता. बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता यावल सातोद रस्त्यावरील सुनिल भाऊसाहब भोईटे यांच शेतात आत्महत्या करण्यापूर्वी
त्यांनी त्याच्या मित्राला फोन करून माझ्या
लहान मलाला भेटण्याची इच्छा आहे असे सांगितले होते. विहीरीजवळ मयताचे दुचाकी आणि चप्पल आढळून आले त्यानुसार विहिरीत उडी

घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले.गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धावघेतली होती.

आवेश याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ठ होवु शकले नाही. घटनेचे वृत्त कळताच यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी घटनास्थळी आपल्या सहकार्यासह धाव घेत मयताचे प्रेत
विहिरी तुन बाहेर काढण्यासाठी तडवी कुढुबास मदत केली

Previous articleशालेय जिवणातच यशस्वी होण्याचा मार्ग मिळु शकतो – सचिन तडवी
Next articleश्री संत सेवालाल महाराज यांचा जिवन परिचय: