प्रतिनिधी:(जालना)मंठा तालुक्यातील बेलोरा गावात आज दुपारी घडली घटना
खुन करून भावी नवरदेव घटनास्थळावरून फरार!
मंठा तालुक्यातील बेलोरा गावातील दीप्ती उर्फ कल्पना संदीप जाधव (वय १८) हिचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील एका तरुणासोबत 17 मार्च 2023 रोजी विवाह ठरला होता.
आज वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी जालना येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आले होते.
यावेळी नियोजित वर असलेला तरुणही बस्ता बांधण्यासाठी सोबत आलेला होता, मात्र अचानक तो गायब झाला या गायब झालेल्या तरुणाने थेट वधूचे गाव असलेले बेलोरा हे गाव गाठले घरी फक्त नियोजित वधू दीप्ती उर्फ कल्पना ही एकटीच होती.यावेळी तिचा गळा कापला, त्यातच ती गतप्राण झाली.
गावातील लोक जमा होताच खून करून आरोपी पसार झाला होता.
दरम्यान घटनास्थळी सेवली पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.
प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना