पवनी: स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यगीत” सादर करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्राचार्या सुजाता अवचार उपप्राचार्य पराग टेंभेकर पर्यवेक्षक अजय ठवरे यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
वर्ग सहा ड च्या विद्यार्थ्यांनी अफजल खानाचा वध ही लघु नाटिका सादर केली तर वर्ग सातच्या विद्यार्थी सुमित कुंभलकर याने शिव गौरव गीत सादर केले.
गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत संगीत शिक्षक शशांक आठले व विशाल निनावे यांच्या चमूने व विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन केले. विद्यार्थ्यांची भाषणे झालीत सहाय्यक शिक्षक श्री त्रिवेदी व प्राचार्या सुजाता अवचार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका प्रज्ञा बंसोड तर आभार प्रदर्शन प्राध्यापक योगेश ढेंगरे यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता