प्रतिनिधी:(जालना) तालुक्यातील रामनगर येथील फिटनेस फंडा ग्रुप च्या वतीने शिवजयंती निमित्त जिजाऊ श्रुष्टी सिंदखेडराजा ते रामनगर पर्यंत शिवज्योत दौड चे आयोजन केले होते जिजाऊ श्रुष्टी पासून शिवज्योत दौड चा प्रारंभ करण्यात आला.
फिटनेस फंडा ग्रुप चे अठरा सदस्य या दौड मध्ये सहभागी झाले होते रामनगर येथे शिवज्योत दौड चे आगमन होतच गावाकऱ्यांच्या वतीने ढोल तशाच्या गजरात व फटाक्यांच्या आताशबाजी करत.
मशालीचे व फिटनेस फंडा ग्रुप च्या सदस्यांचे स्वागत केले या दौड मध्ये शिवाजी शिक्षण मंडळाचे सचिव धैर्यशील चव्हाण, डॉ. धनसिंग बहुरे, ऍड सोपान शेजूळ, कैलास डवले, राजाभाऊ शेजूळ, डॉ.संजय डोंगरे, डॉ.रितेश कुटे, डॉ. लक्ष्मीमन जाधव, डॉ.खेडेकर, माऊली शेजूळ, दशरथ गंगावणे, सलमान कुरेशी, अनिल शिंदे, राजू पिठोरे, गजनन् शेजूळ,तुकाराम ठोंबरे, संभाजी मोरे,आदी सहभागी झाले हनुमान मंदिरात गावाकऱ्यांच्या वतीने फिटनेस फंडा ग्रुप च्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी.
ऍड. गोपाळ मोरे,भाजपा उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष शरद ,नाथा सोनुने, कृष्णा सोनुने, लक्ष्मण शेजूळ, विठ्ठल् पिठोरे, बालाजी तांगडे, शिवाजी सोनुने, योगेश.सोनुने, तुकाराम वाघ, माऊली लांडे, गणेश शेजूळ, संतोष थेटे यांच्या सह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना