इस्माईल शेख शेगाव
शेगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.त्यांनी कठोर परिश्रम घेऊन आपले पूर्ण जिवन स्वराज्य स्थापनेसाठी घालवले. त्यांच्या कार्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा व त्याप्रमाणे भविष्यात वाटचाल सुरू ठेवावी असे आवाहन आ.डॉ संजय कुटे यांनी येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आ.डॉ संजय कुटे यांनी शेगावात विविध ठिकाणी व मुख्य चौकात विविध छत्रपती शिवाजी महाराज मंडळाना भेटी देऊन अभिवादन केले.
तसेच
शिवजयंती निमित्त जमलेल्या शेकडो युवक, कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.शहरातील प्रभाग १,मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण,प्रभाग ४ मध्ये महर्षी वाल्मिकी चौकाचे सौंदर्यीकरण,कुंभारवाडा येथे संत गोरोबा काका चौकाचे सौंदर्यीकरण, वाण प्रकल्प कार्यालय समोर जिजामाता चौकाचे सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन याप्रसंगी त्यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी मा. नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच, मा. उपाध्यक्षा सुषमाताई शेगोकार, भाजप नेते शरदसेठ अग्रवाल,पांडुरंग बुच, मा.नगराध्यक्ष पी एम शेगोकार,संजय कलोरे,राजेंद्र शेगोकार,गजानन जवंजाळ, प्रदीप सांगळे, मा.सभापती पवन महाराज शर्मा,संतोष घाटोळ,अरुण चांडक,राजेश अग्रवाल,सचिन धमाळ, संदीप काळे,विजय यादव,राजेंद्र कलोरे, पुरोषोत्तम हाडोळे,रोहित धाराशिवकर,राजू भिसे,अरविंद इंगळे,भाजप महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस
कल्पनाताई मसणे,डॉ अंजूषा भुतडा, यासह इतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.