Home जळगाव यावल तालुक्यातील ७ परिक्षा केन्द्रांवर ३५८७ इयत्ता बारावीचे विद्यार्थी परीक्षेत बसणार कॉपीमुक्त...

यावल तालुक्यातील ७ परिक्षा केन्द्रांवर ३५८७ इयत्ता बारावीचे विद्यार्थी परीक्षेत बसणार कॉपीमुक्त परिक्षेसाठी भरारी पथके : गट शिक्षणाधिकारी व्ही. सी .धनके यांची माहिती

326

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

आज पासून सुरू होत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत तालुक्यातील सात केंद्रामधून एकुण ३५८७ विद्यार्थी परीक्षेस बसत आहेत.

आज दिनांक २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे. तालुक्यात एकूण सात केंद्र असून केंद्रनिहाय परीक्षार्थींची संख्या कंसातील आहे डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल यावल (६८१) नगरपरिषद संचलित साने गुरुजी उच्च माध्यमिक विद्यालय (५४८) ज्योती विद्यामंदिर सांगवी ( ६१७) चिंचोली माध्यमिक विद्यालय( ३७८) तर फैजपूर येथील डी एन कॉलेज (६१७) मौलाना अबुल कलाम हायस्कूल फैजपूर (५१०) पी एस एम एस विद्यालय बामणोद तालुका यावल ( २३६) असे तालुक्यातून तीन हजार ५८७ विद्यार्थी परीक्षेत बसणार असल्याची माहिती येथील गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली आहे. परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केली असल्याचे , गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी सांगितले.

कॉपी मुक्त वातावरणासाठी जिल्हा पातळीवरील ५ पथकासह दोन तालुका पातळीवरील भरारी पथके तहसीलदार महेश पवार व गट विकास अधिकारी डॉ .मंजुश्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन भरारी पथके राहणार असुन , याशिवाय प्रत्येक परीक्षा केन्द्रावर प्रत्येकी एक असे सात पथकांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती येथील यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ चावदस धनके यांनी दिली आहे .

Previous articleयावल येथे शिवरत्न फाउंडेशन व छत्रपती ग्रुप आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleवीर अभिमन्यू वाचनालयात बाल वाचक मेळावा व शिवजयंती उत्साहात साजरी.