इस्माईल शेख शेगाव
शेगाव वीर.अभिमन्यू वाच
ण्यालयाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण संचालक महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनालयाची माहिती व जाणीव राहावी.
या करीता शिवजयंतीचे औचित्य साधून बालवाचक मेळाव्याचे आयोजन व ग्रंथालयाच्या क्षेत्रात कार्य रत असलेल्या ग्रंथालय भारती या संस्थेचा वर्धापन दीन व शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.श्री कॄष्णलाल रावलानी केशव अर्बन क्रेडिट सोसायटी चे अध्यक्ष तथा वीर अभिमन्यू वाचनालयाचे जेष्ठ संचालक होते.तर प्रमुख अतिथी म्हणून इंगळे इंग्लिश व क्लासेस चे संचालक श्री समाधान इंगळे सर तसेच श्री प्रमोद भाऊ मानकर तथा उपाध्यक्ष श्री प्रल्हाद काळे मंचावर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा.श्री रावलानी सर यांनी चांदोबा मासीकातील चांगल्या व्यक्तींच्या नावावरून आणि हि पॄथ्वी उभी आहे.
चांगली व्यक्ती चांगल्या संस्कारावर व चांगले विचार आणि चांगल्या वाचनावर अवलंबून आहे.ही गोष्ट सांगितली.संस्कार युक्त वाचनातून शिवाजी महाराजांच्या सारखे घडून हे सुराज्य घडवावे असे आवाहन ही केले.
या निमीत्त ग्रंथालय भारती घ्या वर्धापन दीनाचे औचित्य साधून संस्थेने १हजार पुस्तके घेवून त्यांचे वाचनालयात प्रदर्शन लावले.या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणात मोबाईल कांपुटरचा वापर होत असला तरी आजच्या तरुण पिढीने वाचाल तर वाचाल याकडे दुर्लक्ष करु नये.
त्यांना लागणारी सर्व प्रकारची पुस्तके आम्ही वाचन्यालयामार्फत उपलब्ध करून देऊ असे प्रल्हाद काळे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन ग्रंथापाल श्री गणेश ऊज्जैनकर यांनी प्रास्ताविक व परिचय .तसेच आभार प्रदर्शन श्री विजय तायडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री निलेश पुंडकर व लव ठाकरे आणि शंतनु देशपांडे महाराज यांनी परीश्रम केले.
प्रास्तावीक व परीचय प्रल्हाद काळे आभार विजय तायडे