Home जालना यश मिळवायचे असेल तर आपले आदर्श आई -वडील व छञपती शिवराय असले...

यश मिळवायचे असेल तर आपले आदर्श आई -वडील व छञपती शिवराय असले पाहिजे-शिवव्याख्याते संदीप गाडेकर

157

 

प्रतिनिधी:(जालना)आयुष्यात यश‌ मिळवायचे असेल तर आपले आदर्श आपले आई- वडील व छञपती शिवराय आदर्श असले पाहिजे असे प्रतिपादन शिवव्याख्याते संदीप गाडेकर यांनी व्यक्त केले

.दैठाणा बु.येथे शिवजयंती निमित्त शिवव्याख्याते संदीप गाडेकर यांचे शिवव्याख्यान आयोजित केले होते.यावेळी त्यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील घडलेला इतिहास सांगितला.तसेच छञपती शिवाजी महाराज यांचे स्ञी विषय धोरण

छञपती शिवाजी महाराज यांच्या स्वाभिमान.शेतकऱ्यांचा विषयी धोरण,संयम,नियोजन व शञु टप्प्यात आला की कसा कार्यक्रम करायचा यांचे शिवचरित्रातून उदाहरण त्यांनी दिले.

कार्यक्रमाला महिलावर्गाची‌ विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाची प्रास्ताविक पोलिस अशोक बेरगुडे यांनी तर आभार प्रदर्शन कल्याण दादा यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच शञुघ्न कणसे व आयोजक प्रशांत बेरगूडे सर तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती दैठाणा बु.च्या सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.व शिवजयंती शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली

.यावेळी गावातील लहान लहान मुलांनी भाषन व गिते सादर करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.त्यावेळी गावातील समस्त बांधव माता भगिनीं उपस्थित होत्या.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना