Home चंद्रपूर पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत...

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकले. अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक गडचिरोली:-भारत स्काऊट आणि गाईड,जिल्हा संस्था गडचिरोलीच्या वतीने स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस चिंतन दिन म्हणुन २२ फेब्रुवारी २०२३ रोज बुधवारला सकाळी ८.०० वाजता जिल्हा कार्यालय,गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विवेक नाकाडे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.),राजकुमार निकम जिल्हा आयुक्त (स्का.) तथा शिक्षणाधिकारी (माध्य.),अमरसिंह गेडाम जिल्हा चिटणीस तथा शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चिंतन दिवसाबाबत व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छया दिल्या. या कार्यक्रमाची सुरूवात लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या पावन प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून सर्वधर्मिय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले.चिंतन दिनानिमित्त “स्वच्छता अभियान किंवा विविधतेत एकता” या विषयावर चित्रकला स्पर्धा तर “लॉर्ड बेडन पॉवेलचे जीवन चरित्र किंवा आझादी का अमृत महोत्सव” या विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक विविध शाळांमधून ७६ स्काऊटस् गाईडस् यांनी सहभाग घेतला. पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील कु कश्यपी चांगदेव सोरते,कु श्रद्धा दडमल,खिरसागर इंदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर शशांक कोहाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.यात प्रथम,व्दितीय,तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मान्यवरांचे स्थानार्पण झाल्यानंतर पुष्प देवून स्वागत करण्यात आले.चिंतन दिन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देणे.स्काऊट गाईड यांनी चळवळीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणे.शिल,संवर्धन, आरोग्य व सेवा शिक्षणाची चर्तुसुत्री असून आदर्श व चारित्रवान नागरिक घडविणे ही शिकवन लॉर्ड बैडन पॉवेल स्काऊट गाईड चळवळीमध्ये यांनी प्रसार व प्रचार केलेला आहे. श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा. )यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. श्रीमती कांचन बोकडे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गा.)यांनी बी.पी.चा अखेरचा संदेश वाचन केले.श्रीमती वंदना मुनघाटे जिल्हा मुख्यालय आयुक्त (गा.),स्मिता मुनघाटे आजीव सभासद,श्रीमती आशा करोडकर यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून स्काऊटस् गाईडस्ना स्व:ची जाणीव करून देत आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री.एम.जी. राऊत माजी जिल्हा आयुक्त (स्का.) यांनी स्काऊट गाईडना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गडचिरोली शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स,विद्याभारती कन्या विद्यालय,राणी दुर्गावती कन्या विद्यालय,शिवाजी हायस्कूल,भगवंतराव हिंदी हायस्कूल,वसंत विद्यालय, कमलताई मुनघाटे हायस्कूल, संजीवनी विद्यालय,नवेगाव, विद्याभारती विद्यालय, गोगाव व पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल,आरमोरी या शाळांनी सहभाग नोंदविला.पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावल्याने शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा.) यांनी केले तर आभार श्रीमती प्रतिभा रामटेके यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजेंद्र सावरबांधे लिपिक,श्रीकृष्णा ठाकरे,प्रमोद पाचभाई शिपाई,सेवार्थ चुधरी रोव्हर व स्थानिक शाळेतील सर्व स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन, व ७६ स्काऊटस्, गाईडस् असे एकुण १०५ सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ देऊन सांगता करण्यात आली.

57

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-भारत स्काऊट आणि गाईड,जिल्हा संस्था गडचिरोलीच्या वतीने स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस चिंतन दिन म्हणुन २२ फेब्रुवारी २०२३ रोज बुधवारला सकाळी ८.०० वाजता जिल्हा कार्यालय,गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विवेक नाकाडे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.),राजकुमार निकम जिल्हा आयुक्त (स्का.) तथा शिक्षणाधिकारी (माध्य.),अमरसिंह गेडाम जिल्हा चिटणीस तथा शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चिंतन दिवसाबाबत व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छया दिल्या.

या कार्यक्रमाची सुरूवात लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या पावन प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून सर्वधर्मिय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले.चिंतन दिनानिमित्त “स्वच्छता अभियान किंवा विविधतेत एकता” या विषयावर चित्रकला स्पर्धा तर “लॉर्ड बेडन पॉवेलचे जीवन चरित्र किंवा आझादी का अमृत महोत्सव” या विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक विविध शाळांमधून ७६ स्काऊटस् गाईडस् यांनी सहभाग घेतला.

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील कु कश्यपी चांगदेव सोरते,कु श्रद्धा दडमल,खिरसागर इंदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर शशांक कोहाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.यात प्रथम,व्दितीय,तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

मान्यवरांचे स्थानार्पण झाल्यानंतर पुष्प देवून स्वागत करण्यात आले.चिंतन दिन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देणे.स्काऊट गाईड यांनी चळवळीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणे.शिल,संवर्धन, आरोग्य व सेवा शिक्षणाची चर्तुसुत्री असून आदर्श व चारित्रवान नागरिक घडविणे ही शिकवन लॉर्ड बैडन पॉवेल स्काऊट गाईड चळवळीमध्ये यांनी प्रसार व प्रचार केलेला आहे.
श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा. )यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. श्रीमती कांचन बोकडे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गा.)यांनी बी.पी.चा अखेरचा संदेश वाचन केले.श्रीमती वंदना मुनघाटे जिल्हा मुख्यालय आयुक्त (गा.),स्मिता मुनघाटे आजीव सभासद,श्रीमती आशा करोडकर यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून स्काऊटस् गाईडस्ना स्व:ची जाणीव करून देत आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री.एम.जी. राऊत माजी जिल्हा आयुक्त (स्का.) यांनी स्काऊट गाईडना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गडचिरोली शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स,विद्याभारती कन्या विद्यालय,राणी दुर्गावती कन्या विद्यालय,शिवाजी हायस्कूल,भगवंतराव हिंदी हायस्कूल,वसंत विद्यालय, कमलताई मुनघाटे हायस्कूल, संजीवनी विद्यालय,नवेगाव, विद्याभारती विद्यालय, गोगाव व पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल,आरमोरी या शाळांनी सहभाग नोंदविला.पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावल्याने शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा.) यांनी केले तर आभार श्रीमती प्रतिभा रामटेके यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजेंद्र सावरबांधे लिपिक,श्रीकृष्णा ठाकरे,प्रमोद पाचभाई शिपाई,सेवार्थ चुधरी रोव्हर व स्थानिक शाळेतील सर्व स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन, व ७६ स्काऊटस्, गाईडस् असे एकुण १०५ सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ देऊन सांगता करण्यात आली.

Previous articleयश मिळवायचे असेल तर आपले आदर्श आई -वडील व छञपती शिवराय असले पाहिजे-शिवव्याख्याते संदीप गाडेकर
Next articleपॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकले.