इस्माईल शेख शेगाव
शेगांव शहरातील मंगलम नगरामध्ये मावसदिराने वहिनीचा विनयभंग केल्याची घटना चहा घडली. तुम्ही दिसायला खुप सुंदर आहात, तुमच्या सारखी बायको भेटणं भाग्यचं..
असे म्हणत वहिनीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न दिराकडुन होत होता. मात्र दिर असल्याने सदर विवाहीतेन मस्करी समजुन याकडे वारंवार दुर्लक्ष केले. दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी तो विवाहीतेच्या घरी आला व दादा कुठे आहेत असे
विचारले, त्यावेळी ते कामावर गेले आहेत असे सांगून विवाहीता करण्यास किचनमध्ये गेली. त्यावेळी मावसदिराने मागे जावून गैरवर्तणुक करीत तिचा विनयभंग केला.
याबाबत पिडीत महिलेने शेगांव शहर पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणी मावसदिराविरुध्द कलम 354, 354 (अ)506 भादविनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.