इस्माईल शेख शेगाव शहर
शेगाव: राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी येथील सौ रुपाली वानखडे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी 21 फेब्रु. व 22 फेब्रुवारी असे दोन दिवसीय बैठक शेगाव येथील शासकीय विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली होती.
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्या विरोधात आवाज उठविण्याचा दृष्टिकोनातून स्थापन झालेल्या राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्य विस्तार व संघटना वाढीसाठी
सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ रूपाली वानखडे यांची राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे . या निवडीबद्दल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे