Home Breaking News राज्यातील संगणक परिचालकांच्या प्रलंबीत मागण्यासाठी आजपासुन काम बंद व १ मार्चपासुन संघटनेच्या...

राज्यातील संगणक परिचालकांच्या प्रलंबीत मागण्यासाठी आजपासुन काम बंद व १ मार्चपासुन संघटनेच्या वतीने मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन

330

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारीत आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन यंदाच्या अर्थसंकल्पातुन किमान वेतनासाठी निधीची तरदुत करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक १ मार्च २०२३ पासुन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असुन,

यावल तालुक्यासह ईतर ठीकाणी देखील आजपासून संगणक परिचालकांनी आपले काम बंद आंदोलन मुरू केले असुन, यासंदर्भातील माहीती निवेदन तालुक्यातील संगणक परिचालकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे .

या संदर्भात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने यावलच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , ग्रामविकास व माहीती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातुन सुरु असलेल्या पुर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पाअंतर्गत मागील ११ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रमाणीकपणे काम करत आहेत ,

ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरतपणे करत आहेत त्याच सोबत कोरोना काळात महत्वाची जबाबदारी याच संगणक परिचालकांनी बजावती ही सेवा करतांना सुमारे १९ संगणक परिचालकांनी आपला जिव सुद्धा गमावला आहे .

तसेच शेतकरी कर्जमाफी योजना , प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत सुमारे ५४लाख कुटुंबांचा सव्हें याच संगणक परिचालकांनी केला आहे . असे अनेक प्रकारचे कामे प्रमाणिकपणे करून सुद्धा केवळ ७००० रुपये हे महागाईच्या काळात आतशय तुटपुंजे मानधन मिळते तेही केव्हाच वेळेवर मिळत नाही .

त्याचप्रमाणे संगणक परिचालक हे ग्रामपंचायत मध्ये बसुन सर्व प्रकारची कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक असुन , ग्रामविभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २o१८मध्ये या सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारीत आकृतीबंधात पुर्व निर्मिती करण्याची शिफारस केलेली आहे . त्यानुसार राज्य संघटनेच्या माध्यमातुन केली असता ११ मार्च २०२१ रोजी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागणी मान्य करीत तेव्हा लेखी आश्वासन देत प्रश्न सोडविण्याचे मान्य केले होते .

परन्तु त्यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता त्यामुळे नुकत्याच झालेल्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातुन २७ते २८ डिसेंबर र०२२ रोजी रात्रदिवस आंदोलन व या आंदोलनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणविस आणी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन यांनी घेतली व दिलेल्या लेखी आश्ववसानुसार ११ जानेवारी २०२३ रोजी ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व त्यात यावलकर समितीने केलेल्या शिफारसीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असुन , परंतु अद्यापपर्यंत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात १ मार्च र०२३रोजी सकाळी १० वाजता पासुन मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असुव , आज२७ फेब्रुवारी २०२३पासुन मागणी मान्य होईपर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत संगणक परिचालकांकडे असलेली सर्व कामे बंद करण्यात आली आहे .

याबाबतचे निवेदन यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांना देण्यात आले असुन , यावेळी महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष संजय अरुण तायडे , तालुका सचिव सुधाकर कोळी , तालुका उपाध्यक्ष हर्षल सोनवणे , विलेश बावस्कर , सागर मोरे , रौनक तडवी , जावेद तडवी हे यावेळी उपस्थित होते .

Previous articleमहसूल मंडळ कडून तालुक्या ठिकाणी महास्वराज्य भव्य कार्यक्रमांमध्ये विधवा महिलेचा अर्ज स्वीकारला
Next articleमराठी भाषा संवर्धन हे करणे मराठी माणसाचे जिवंत पणाचे लक्षण आहे–डाएटचे प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने प्रतिपादन.