अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
गडचिरोली:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यां-शिक्षक व पर्यवेक्षकिय यंत्रणेतील कर्मचारी यांच्यासाठी आठवडा भरापासून मराठी विभागाच्या वतीने शिक्षकांकरीता पाठ्यपुस्तकातील कविता गायन स्पर्धा,काव्यगायन स्पर्धा,विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि विषय साधनव्यक्ती यांच्यासाठी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानिमित्ताने कवी वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण गडचिरोलीच्या सभागृहात विजेत्या स्पर्धकांना, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त,नवोपक्रम स्पर्धेत प्राविण्य प्राप्त शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम डाएट गडचिरोली संस्थेचे प्राचार्य डॉ विनित मत्ते,प्रमुख अतिथी संध्या येलेकर कनिष्ठ व्याख्याता,मराठी विभाग प्रमुख तथा जिल्हा समन्वयक, अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार,अधिव्याख्याता पुनित मातकर,विषय सहायक डॉ विजय रामटेके,गुरूराज मेंढे,प्रदिप पाटील,तपन सरकार,प्रभाकर साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार यांनी केले तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने भाषेचा दैनंदिन जीवनात वापर आणि मराठी माणसाची भूमिका यावर श्रीमती संध्या येलेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना डॉ विनित मत्ते यांनी प्रतिभावान मुलांनी बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी नवनवीन उपक्रमात हिरीरीने सहभागी व्हावे,सोबतच शिक्षकांनी अध्ययन-अध्यापन प्रकिया आनंददायी करण्यासाठी,सकारात्मक विचार आणि कृतीशील बदल, सृजनशील कल्पना,व्यक्तिमत्वाचे विविध पैलू विकसित करण्यासाठी,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी सदैव तत्पर,सजग राहावेत,स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २३ गुणवंत विद्यार्थी,शिक्षक व विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विजय रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर साखरे यांनी व्यक्त केले.