Home Breaking News यावल भुसावळच्या मार्गावरील अंजाळे घाटाजवळ रात्री घडलेल्या रस्तालुटीतील दोन आरोपी शोधण्यात पोलिसांना...

यावल भुसावळच्या मार्गावरील अंजाळे घाटाजवळ रात्री घडलेल्या रस्तालुटीतील दोन आरोपी शोधण्यात पोलिसांना यश

1578

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

रात्री यावल भुसावळ रस्त्यावर अजय मोरे हे भुसावळ कडून आपल्याकडील शाईन कंपनीच्या मोटरसायकलने यावल कडे येत असतांना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची मोटरसायकल रोखत त्यांना पिस्तोलचा धाक दाखवून त्यांचे कडील मोटर सायकल सह मोबाईल घेऊन पसार झाले होते यातील दोन संशयीत आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे .

सदरची घटना रात्री पावणेदहा वाजे ची सुमारास घडली आहे घटनेचे वृत्त येथील पोलीस ठाण्यात कळताच पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व त्यांचे पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना झाली आहे एस१९४२ शाईन कंपनीची गाडी तसेच जवळील मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती,

या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे , सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठान व पोलीस पथकांनी आरोपींच्या शोध कार्यासाठी वेगाने तत्परता दाखवुन काही तासातच या रस्ता लुटीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी म्हणुन करण रमेश पवार व विक्की अंकुश साळवे दोघ राहणार आसोदा तालुका जिल्हा जळगाव यांना यावल शिवारातुन शिताफीने अटक करण्यात यश मिळाले असुन , तर दोन आरोपींचा शोध अद्याप लागतोला नाही .

चोरटे त्यांचे कडील बुलेट व एक्टिवा गाडीने आले होते . यावल भुसावळ हा मार्ग वाहतुकीचा असुन रात्रीच्या वेळेस देखील मोठया प्रमाणावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरीकांची नेहमीच वर्दळ या मार्गावर असते, या ठीकाणी अंजाळे घाटावर मागील अनेक वर्षापासुन या ठिकाणी पोलीस चौकी बांधण्यात आली असून मात्र नागरीकांच्या रक्षणासाठी या चौकीवर पोलीस राहात नसल्याने अशा प्रकारच्या रस्तालुटीच्या घटना घडत असतात , तरी पोलीस प्रशासनाने या पोलीस चौकीवर रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी नागरीक करीत आहे .

Previous articleमराठी भाषा संवर्धन हे करणे मराठी माणसाचे जिवंत पणाचे लक्षण आहे–डाएटचे प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने प्रतिपादन.
Next articleआर.पी.आय आठवले RPI गटाचा भुसावल येथे प्रवेश सोहळा संपन्न युवा जळगांव जिल्हा सचिव पदी सुपडू संदानशिव यांची निवड