माहिती अधिकार अधिनियम 2005 मार्फत माहिती अधिकाराखाली खरोखर माहिती मिळते का?
संग्रामपूर तालुक्यामधील वरवट बकाल येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये केंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या माध्यमातून दोन फेब्रुवारी 2023 चा माहिती अर्ज युवा स्वाभिमान पार्टी तालुकाध्यक्ष रवी देवराव सोळंके यांनी टाकला होता.
त्याचप्रमाणे त्यांना माहिती मिळाली यां माहिती मध्ये त्यावर झालेला खर्च, वरवट बकाल मधील सिमेंट काँक्रेट नाही त्यावर झालेला खर्च 2लाख 80 हजार 888 रु त्यानंतर पेवर” ब्लॉक बांधकाम एक लाख 70 हजार 241 रुपये त्यानंतर कन्या शाळेत प्युअर ब्लॉक बसविणे खर्च 65 हजार रुपये अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृह बांधकाम एक लाख 95 हजार 800 रुपये खर्च परंतु अंगणवाडी क्रमांक टाकलेला नाही ( वरवट बकाल मध्ये चार ते पाच अंगणवाडी आहेत परंतु कोणत्या अंगणवाडीला स्वच्छतागृह बांधण्यात आले?
बायबूट खरेदी 27 हजार ( म्हणजे तीन चाकी सायकल कचराकुंडी शोभेचे सामान सारखी उभी आहे शोरूम मध्ये?
त्यानंतर डस्टबिन खरेदी एक लाख 13 हजार 250 ह्या डजबीने सुद्धा शोभेचे सामान बनले आहेत? त्यानंतर पाणीपुरवठ्यावरील भरणा 75 हजार रुपये त्यानंतर पाईपलाईन करणे 7 लाख 3 हजार 900 रुपये खर्च व त्यानंतर मोठमोठे फोकस लावलेले आहेत त्यांचा लाईट वीज बिल भरणा 24 हजार रुपये. व शिवणकाम प्रशिक्षण 78 हजार रुपये खर्च सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी ग्रामपंचायत मध्ये लावण्याकरिता 81 हजार रुपये खर्च.
व मागील 140 गाव पाणीपुरवठा पाणी भरणा 50 हजार रुपये विशेष म्हणजेG S T, T D S, रॉयल्टी लिव्हर सेम्स इत्यादी भरणा म्हणजे काही समजले नाही? दोन लाख 70 हजार 762 रुपये तसेच या अर्जामध्ये लिहिलेले वरील प्रमाणे कामे वरवट बकाल येथे झालेले असून आपणाला माहिती देण्यात येत आहे.
. ही माहिती ग्रामपंचायत कार्यालय वरवट बकाल तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा दिनांक 1 मार्च 2023 ला ग्रामविकास अधिकारी बोडखे यांनी दिली .
परंतु वरवट फाट्यावरील डस्टबिन म्हणजे कचराकुंड्या लोकांनी अगोदर बसविलेल्या लावल्या परंतु त्यांना दुकानदारांना अडचण निर्माण होऊ लागली आणि कचरा कुंड्याच्या’ ऐवजी बाहेर पडू लागला त्यामुळे फाट्यावर एक ते दोन ठिकाणीच पाहायला मिळेल कचराकुंड्या ( डसबीन ) महत्त्वाची अशी आहे की ग्रामीण भागात प्युअर ब्लॉगचे किंवा कशाचेही काम ग्रामपंचायत मार्फत झाले तर त्या कामाचे बोर्ड( फलक लावणे अनिवार्य असते.)
प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलावली जाते. त्यामध्ये गावाच्या आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केला जातो. त्यानंतर या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे किती उपलब्ध निधी आहे आणि सरकारकडून किती अपेक्षित आहे, यासंबंधीचं एक अंदाजपत्रक तयार करून कामे केली जातात. खरोखर या विषयाला धरून ग्रामपंचायत चालवीत असतात का?
#Grampanchayat