यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
राज्यात शिवसेना ( ठाकरे ) राष्ट्रवादी पक्ष व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढविण्यात आलेल्या कसबा मतदार संघाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करीत दणदणीत विजय झाल्या बद्दल यावल तालुका महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शहरातील बुरूज चौकात फटाके फोडुन जल्लोष साजरा केला.
या वेळी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे*, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा . मुकेश येवले , शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, यावल शेतकी सहकारी संघाचे चेअरमन अमोल भिरूड ,काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, शिवसेनेचे शरद कोळी, शिवसेनेचे संतोष खर्चे, नगरसेवक मनोहर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे फैजपूर अध्यक्ष अन्वर खाटीक, युवक राष्ट्रवादीचे देवकांत पाटील, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष फैजान शाह, राष्ट्रवादीचे करीम चौधरी , शिवसेनेचे विवेक अडकमोल, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफफार शाह , विवेक सोनार, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , काँग्रेस आदीवासी विभागाचे बशिर तडवी, अमर कोळी, शेख नईम, विक्की सोनवणे,निसार भाई, अश्फाक शाह, सरफराज शाह,सागर देवानं, मोहसिन खान, फारूक मुंशी यांच्यासह आदी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.