Home Breaking News गाडऱ्या जामन्या गावास उत्कृष्ठसेवा देणारे ग्रामसेवक रूबाब तडवी राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने...

गाडऱ्या जामन्या गावास उत्कृष्ठसेवा देणारे ग्रामसेवक रूबाब तडवी राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

1889

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन अतिदुर्गम क्षेत्रात आदीवासी गावात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रूबाब मोहम्मद तडवी यांचा आज महाराष्ट्र शासनाच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आले .

जळगाव येथील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेश मामा भोळे , जिल्हाधिकारी अमन मित्तल, जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया , ग्रामसेवक संघटनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजिव निकम, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार आप्पा गोराळे सर्व सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे.

यावलच्या गटविकास अधिकारी डॉ . मंजूश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुक्यात २o१६ते २०१७या कालावधीचा राज्यस्तरिय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने मागील अनेक वर्षापासुन यावल तालुक्यातील गाडऱ्या जामन्यायासातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रात प्रशासकीय सेवा करीत आदीवासी परिसरातील ग्रामीण भागात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रुबाब मोहम्मद तडवी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

सेवानिवृत्तीच्या काही अंतरावर असलेले रूबाब मोहम्मद तडवी यांना राज्यस्तारिय आदर्श पुरस्कार त्यांच्या कुटुंबातील राष्ट्रपती पुरस्कार पत्नी मेहमुदा तडवी, मुलगी अंजली तडवी मुलगा राहुल तडवी यांच्या सोबत देण्यात आला .

रूबाब तडवी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव पी व्ही तळेले ,हितु महाजन , मजीद तडवी , राजु तडवी , बि के पारधी , सुबोत सोहे ,रविन्द्र बाविस्कर , रूपाली तळेले , दिपक तायडे ,डी एस तिडके , सोनाली सोनवणे ,भोजराज फालक , प्रियंका बाविस्कर घरकुल प्रोग्रामर मिलिंद कुरकुरे चेतन चौधरी किरण सपकाळ हर्षल चौधरी जावेद तडवी यांच्यासह ग्रामसेवक संघटनेच्या सर्व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले आहे .

Previous articleमाहिती अधिकार 2005 अधिनियम — मधील बिलासहित माहिती द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा
Next articleराष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड. जिल्हा कार्याध्यक्षपदी कविता राजवैद्य तर जिल्हा सचिव पदी सुनीता पाटील