Home बुलढाणा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड. जिल्हा कार्याध्यक्षपदी कविता राजवैद्य...

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड. जिल्हा कार्याध्यक्षपदी कविता राजवैद्य तर जिल्हा सचिव पदी सुनीता पाटील

157

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करण्यात आली असून बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी शेगाव येथील राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या कविता राजवैद्य यांची तर मलकापूर येथील समाजसेविका सुनिता शालिग्राम पाटील यांची निवड राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी केली आहे. रेल्वेमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना विविध समस्या व अडचणींना तोंड द्यावे लागते.

या समस्या व अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याबाबत रेल्वे प्रशासना समोर आवाज उठविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आलेली असून बुलढाणा जिल्ह्यात त संघटनेचा विस्तार व कार्य वाढविण्यासाठी कविता राजवैद्य व सुनिता पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा सचिव या पदावर नियुक्ती करण्यात

आल्याची माहिती राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी दिली आहे. महिला प्रवाशांच्या समस्या बाबतची जाणीव असलेल्या दोघासक्रिय महिलांची राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण पदावर निवड झाल्याबद्दल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये समाधान व आनंद व्यक्त करण्यात येत आहे

Previous articleगाडऱ्या जामन्या गावास उत्कृष्ठसेवा देणारे ग्रामसेवक रूबाब तडवी राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
Next articleफागुन मास निमित्त श्री सांवरे के बावरे भजन परिवार शेगावच्या वतीने भव्य निशान यात्रा संपन्न.