Home जालना अर्थसंकल्पीय अधिवेशन-2023

अर्थसंकल्पीय अधिवेशन-2023

159

 

वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मदतीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक:

प्रतिनिधी:(मुंबई)अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे झालेच पाहिजेत.अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे.नुकसान झालेल्या पिकाचे मदत जाहीर करा,जाहीर करा.शेतकऱ्यांना मदत भरपाई जाहीर करा.मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी. नुकसान भरपाई जाहीर करा,नाहीतर खुर्च्या खाली करा.अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

प्रतिनिधी-तुकाराम राठोड

Previous articleफागुन मास निमित्त श्री सांवरे के बावरे भजन परिवार शेगावच्या वतीने भव्य निशान यात्रा संपन्न.
Next articleजगातील पहिली ‘आयआयएफएल जितो अहिंसा रन’ 65 भारतीय शहरांमध्ये आणि यूएस व यूकेसह 20 आंतरराष्ट्रीय ठिकाणी होणार