Home मुंबई जगातील पहिली ‘आयआयएफएल जितो अहिंसा रन’ 65 भारतीय शहरांमध्ये आणि यूएस व...

जगातील पहिली ‘आयआयएफएल जितो अहिंसा रन’ 65 भारतीय शहरांमध्ये आणि यूएस व यूकेसह 20 आंतरराष्ट्रीय ठिकाणी होणार

100

 

जितोने आयोजित केलेल्या या महासोहळ्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळणे अपेक्षित

मुंबई, मार्च 09, 2023: जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने (जितो) शांती व अहिंसेचा पुरस्कार करण्याच्या उद्देशाने ‘आयआयएफएल जितो अहिंसा रन’चे आयोजन केले आहे. जागतिक स्तरावरील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. ‘अहिंसा रन’ अनेक विक्रम मोडेल आणि गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले अशी अपेक्षा आहे.

जितो ही जागतिक स्तरावरील सामाजिक-आर्थिक संघटना सेवा, ज्ञान व समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाप्रती समर्पितपणे काम करते. या संघटनेने भारतातील 65 शहरांमध्ये तसेच 20 आंतरराष्ट्रीय ठिकाणी ‘अहिंसा रन’चे आयोजन केले आहे. रविवार, 2 एप्रिल 2023 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 5.30 वाजता ‘अहिंसा रन’ सुरू होईल. भारतातील तसेच जगभरातील सर्व क्षेत्रांतील व समुदायांतील लोक यात सहभागी होऊन अहिंसेच्या उद्दिष्टासाठी धावू शकतात.

जैन धर्मातील 24वे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर (सर्वश्रेष्ठ उपदेशक) यांची जयंती साजरी करण्यासाठी जितोने ‘अहिंसा रन’ या अनन्यसाधारण उपक्रमाचे आयोजन केले आहे. श्रमण भगवान महावीर यांच्या सर्वांत मोठ्या प्रतिज्ञांपैकी एक असलेल्या अहिंसेचे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्व व संबंध यांबद्दल हा उपक्रम जागरूकतेचा प्रसार करणार आहे.

जितो लेडीज विंगच्या चेअरपर्सन श्रीमती संगीता लालवानी या उपक्रमाचा विषय स्पष्ट करताना म्हणाल्या, “देशातील व जगभरातील लोकांना शांती व अहिंसेच्या मुद्दयांवरून जोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘अहिंसा रन’ हा पहिला उपक्रम आहे. शांतताप्रिय समुदायांच्या जडणघडणीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. या रनमध्ये अहिंसेच्या प्रतिज्ञेचे पालन केले जाईल आणि प्रत्येक सजीवाच्या पावित्र्याचा व प्रतिष्ठेचा आदर कृती, वचन व विचारांद्वारे राखला गेला पाहिजे या श्रमण भगवान महावीरांच्या अमूल्य शिकवणीचा पुनरुच्चार केला जाईल. लोकांना प्रेम, क्षमाशीलता आणि त्यागाचे महत्त्व अहिंसेच्या स्वरूपातून समजावून घेण्यात मदत करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. आयुष्य अधिक चांगल्या रितीने जगण्यासाठी तसेच सौहार्दपूर्ण समाजांच्या उभारणीसाठी हे आवश्यक आहे.”

“शांती व अहिंसेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण आम्ही भारतातील व जगभरातील प्रत्येक कुटुंबाला देत आहोत,” असे आवाहन श्रीमती लालवानी यांनी केले. तसेच या उपक्रमात लाखो लोक सहभाग घेऊन तो एक जागतिक विक्रम ठरेल अशी अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

केंद्रीय महिला व बालविकास तसेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्री श्रीमती स्मृती इरानी यांनी आयोजकांना या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अहिंसा रनच्या उद्दिष्टाची प्रशंसा केली. प्रख्यात संगीतकार श्री. ए. आर. रहमान, माजी क्रिकेटपटू व खासदार श्री. गौतम गंभीर आणि भारताच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार तसेच प्रख्यात महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे आणि हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून जास्तीतजास्त लोकांनी शांती व अहिंसेच्या प्रसारासाठी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

आयआयएफएल या सोहळ्याचे राष्ट्रीय प्रायोजक असून, जीएम व मायक्रो लॅब्ज सहप्रायोजक आहेत.

‘लक्ष्य’ कार्यक्रमाच्या वेळीच जितोमधील मान्यवरांनी या ऐतिहासिक जागतिक उपक्रमाची घोषणा केली होती. आयआयएफएलचे अध्यक्ष श्री. निर्मल जैन, जीएमचे अध्यक्ष श्री. रमेश जैन, मायक्रो लॅब्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप सुराणा यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली होती. जितोचे चेअरमन श्री. सुखराज नाहर, व्हाइस चेअरमन श्री. राजेंद्र जैन, अध्यक्ष श्री. अभय श्रीश्रीमल, उपाध्यक्ष श्री. कांतिलाल ओसवाल व श्री कुशल भन्साली, महासचिव श्री. मनोज मेहता, सचिव श्री. संजय लोढा व श्री. संजय जैन, जितो लेडीज विंगच्या संचालकपदाचा सूत्रे हाती असलेल्या श्रीमती सुनिता बोहोरा आणि जितो लेडीज विंगच्या चेअरपर्सन श्रीमती संगीता लालवानी आदीही त्यावेळी उपस्थित होते.

 

‘अहिंसा रन’चे तपशील:

– रविवार, 2 एप्रिल 2023 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 5.30 वाजता भारतातील 65 शहरांमध्ये आणि 20 आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर सुरू होणार

– जगभरातील सर्व क्षेत्रांतील, कोणत्याही समुदाय, जात किंवा पंथाचे लोक ह्यात सहभागी होऊ शकतात

– नोंदणी शुल्क भरून सहभागी झालेल्या प्रत्येकाला टी-शर्ट, पदक आणि न्याहरी दिली जाईल.

– 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा तीन प्रवर्गांमध्ये हा रन आयोजित करण्यात आला आहे.

– अधिक माहितीसाठी तसेच नोंदणी करण्यासाठी भेट द्या: www.Ahimsarun.com

 

जितोविषयी : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) हा द्रष्ट्या जैन उद्योजक आणि व्यावसायिकांची एक अनन्यसाधारण, बहुभागधारक समुदाय आहे. भविष्यकाळातील समुदायाला व व्यापक समाजाला आकार देण्याप्रती एक सामाईक बांधिलकी हा समुदाय मानतो. अहिंसक, दारिद्र्यमुक्त व विकारमुक्त जगाच्या निर्मितीच्या दृष्टीने अधिक आर्थिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी, वंचितांची काळजी घेण्यासाठी तसेच मानवतेला समृद्ध करण्यासाठी एक जागतिक दर्जाची संस्था होण्याचे उद्दिष्ट या समुदायापुढे आहे. कंपनी कायदा, 1956 खाली (आताच्या कंपनी कायदा, 2013मधील कलम 8) जितोची कंपनी म्हणून नोंदणी झाली आहे. कंपनीच्या व्यापक घटनेनुसार, भारतातील व परदेशांतील, सर्व उद्योजक, व्यावसायिक, ज्ञानाधारित काम करणारे सहभागी होऊ शकतात. भारतभर व जगभरात शाखा असलेली ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे.

Ends
Regards,
Deepika Parkar 9768073785

Previous articleअर्थसंकल्पीय अधिवेशन-2023
Next articleमराठा पाटील युवक समितीची गौलखेड येथे 82 वी शाखा स्थापन थाटात उद्घाटन सोहळा संपन्न