सिंदी रेल्वे….मागील काही महिन्यांपासून शहरातील नदीपलीकडील वार्ड क्रमांक ३ मधील घरगुती नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. वारंवार तक्रार करूनही ही समस्या दूर न झाल्याने भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अमोल गवळी यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांनी नगर पालीके धडक देऊन, शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा असे निवेदन मुख्याधिकारी कळंबे यांना देण्यात आले.
मागील काही दिवसांपासून शहरातील नदीपलीकडील वार्ड क्रमांक तीन च्या अनेक घरगुती नळाला येणारे पाणी गढूळ व दुर्गंधी युक्त येत असल्याने पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या परंतु तक्रारीचा निपटारा होत नसल्यामुळे वार्डातील संतापलेल्या महिलांनी अमोल गवळी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद येथे धडक देऊन स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा हि मागणी रेटून धरली, यासंदर्भात लेखी निवेदन मुख्याधिकारी कळंबे मॅडम यांना दिले.
शहराला दहा किलोमीटर अंतरावरून वाकसुर येथून पाणीपुरवठा केल्या जातो,दर दोन दिवसांनी भाग बदलत वार्डातील भागाला पाणीपुरवठा केला जातो, सिंदी कांढळी रोड चे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या खोदकामात महिन्यातून किमान दोनदा तरी जलपुरवठा करणारी पाईपलाईन फुटत असून पाईप लाईन दुरुस्ती चे काम पुर्ण होत पर्यंत व्यवस्थित व सुरळीत शहराला पाणीपुरवठा होत नाही.
निवेदनाला घेऊन जाणाऱ्यांना मुख्याधिकारी कळंबे मॅडम यांनी तुमचा प्रश्न येत्या चार ते पाच दिवसात सोडवण्यात येईल अशी हमी दिली. या वेळी अमोल गवळी गणेश काळबांडे, सुरेश कातोरे, पुष्पा भोंदे, भाग्यश्री कातोरे, सविता सोनटक्के, वनिता काळबांडे, स्वाती दिवे, शशीकला बोरकर, संगिता काटोले, छबु घंगारे, दिक्षा काळबांडे, सुलोचना मेटांगळे, ऐश्वर्या गवळी, चंद्रकला कातोरे आदींची उपस्थिती होती….