प्रतिनिधी:(जालना) तालुक्यातील सावरगाव हडप गावातील शेतकऱ्याच्या सोंगणी करून गंजी घालून ठेवलेल्या हरबरा पिकाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचे घटना घडलीय.
विष्णू रंगनाथ शिंदे यांनी अवकाळी पाऊसाचा भीतीने दुप्पट मजूर लाऊन हरबरा सोगंणी केली त्यांची गंजी ही शेतात घालून ठेवली आतांना आज सकाळी शेतात कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तीने गंजीला आग लावून पेटून दिल्याने.
यात संपूर्ण गंजी जळून खाक झाल्याने त्यांचं यात दीड लाखाचे नुकसान झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झालीय.या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ या अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागमी शेतकऱ्यांनी केलीय.
प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना
#shetakri