Home जालना दिव्यांग तपासणी व कृञिम अवयव प्रत्यारोपण शिबीर, आयुषी बगडिया:गरजवंतांनी लाभ घ्यावा:

दिव्यांग तपासणी व कृञिम अवयव प्रत्यारोपण शिबीर, आयुषी बगडिया:गरजवंतांनी लाभ घ्यावा:

141

 

(प्रतिनिधी-तुकाराम राठोड)

जालना येथील अग्रशक्ती बहु मंडळ आणि नारायण सेवा संस्थान उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ( ता. 14) मार्च सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 या वेळेत छञपती संभाजी महाराज नगर परिसरातील हॉटेल बगडिया इंटरनॅशनल येथे दिव्यांग व पोलीओ ग्रस्तांसाठी मोफत तपासणी तसेच कृञिम अवयव प्रत्यारोपण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

आतापर्यंत 30 लाभार्थ्यांची नोंद झाली असून शिबीर स्थळी नोंदणीची सुविधा उपलब्ध असल्याने गरजवंतांनी शिबीरात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन अग्रशक्ती बहु मंडळाच्या अध्यक्षा आयुषी आदित्य बगडिया यांनी केले आहे.

शिबिराच्या आयोजना बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पञकात आयुषी बगडिया यांनी सांगितले की,मंगळवारी सकाळी 10.00 वा. पन्नालाल बगडिया यांच्या हस्ते शिबीराचे उद्दघाटन होईल, अध्यक्षस्थानी डॉ. राजेश सेठीया हे राहतील,या वेळी नीता बगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

असे नमूद करत आयुषी बगडिया यांनी सांगितले, मंडळातर्फे गतवर्षी घेतलेल्या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता .यंदा उदयपूर येथील नारायण सेवा संस्थांनच्या मदतीने आयोजित सदर शिबीरात दिव्यांगांच्या तपासणी सह नैसर्गिक आपत्ती, अपघातात हात- पाय गमावलेल्या व्यक्तींना कृञिम हात- पाय प्राप्त व्हावे यासाठी 02 तज्ञ डॉक्टर व कर्मचारी तपासणी करतील. त्यानंतर पुढील शस्त्रक्रिया केली जाईल. असे आयुषी बगडिया यांनी स्पष्ट केले.

दरम्यान कृञिम हात- पायाचे प्रत्यारोपण केल्यानंतर गाडी चालविण्यासह सर्व कामे सहजपणे करता येतील.असे सांगून गरजवंतांनी मोठ्या संख्येने शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा आयुषी बगडिया,सचिव शितल अग्रवाल,कोषाध्यक्षा स्नेहा भारुका,उपाध्यक्षा रिता अग्रवाल,सहसचिव मेघा बगडिया,मार्गदर्शक सारिका तालुका,नम्रता पित्ती,सपना अग्रवाल,पूजा तवरावाला,प्रकल्प प्रमुख संध्या अग्रवाल,ममता गुप्ता,प्रित्ती मल्लावत,यांच्या सह अग्रशक्ती बहु मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Previous articleअज्ञात व्यक्तीने हरबरा पिकाच्या गंजीला लावली आग..आगीत शेतकऱ्यांचे दीड लाखाचे नुकतास
Next articleजुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून सईबाई मोटे रुग्णालयातील कर्मचारी संपावर