विठ्ठल अवताडे शेगाव
जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील कर्मचारी राज्यव्यापी संपात सहभागी झाले , यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या सहिनिशी मा. वैद्यकीय अधीक्षक , स. मो. सा.रू.शेगाव यांना निवेदन देऊन आज सकाळी रुग्णालयाच्या परिसरात सर्व कर्मचारी यांनी एकत्र येऊन संप पुकारला
, या वेळी घोषणा देऊन आम्ही सर्व या संपात सहभागी असून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आम्ही हा संप पाळणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले , या मध्ये जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन या वेळी देण्यात यामधे असे म्हटले आहे की 1 नोहेंबर २००५ नंतर नियुक्त राज्य सरकारी निम सरकारी इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्ववत लागू करण्यात यावी.
या प्रमुख मागणी व इतर नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागणी करता दि १४-३-२०२३ पासून पुकारण्यात आलेल्या राज्य सरकारी ,राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, निम सरकारी संघटना,तसेच विविध समन्वय समिती, विविध संवर्ग निहाय संघटना यांच्या बेमुदत संपात आम्ही सहभागी होत आहे ,
१४-३-२०२३चे संपाची रीतसर नोटीस राज्य शासनाला यापूर्वीच देण्यात आलेली आहे ,तरी खालील सही करणारे कर्मचारी संपात सहभागी होत असून याची माहिती या निवेदन द्वारे आपणास देण्यात येत आहे या निवेदनावर नरेश झुंगारे , मिलिंदकुमार कस्तुरे , संदीप कोकनी ,शिवशंकर घोडघासे ,विनय बनारसे,श्रीधर जाधव ,महेश घोरड ,श्रीमती योगिता दाभाडे ,नावेद खान ,पठाण खान, गणेश गणेश वायाळ मंगेश जोशी,श्रीमती. रंजना मुंडे, बकुळा मेसरे, सोनाली ढगे, मीनाक्षी शास्त्रकार, सुनंदा फुसे, भाग्यश्री पानपट्टे, बाळासाहेब नागरगोजे, सुनीता तायडे, रश्मी मोरे, सणात वराळे,साधना अंध्याल, वैशाली जगताप, अश्विनी गायकवाड, आशिष शिंगणे, व ईतर सर्व डी सी पी स व एन पी एस कर्मचारी..
. यांच्या सह जवळपास पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत