भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीने अर्थसंकल्पीय विश्लेषण या विषयावर महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी सोलापूर शहरातील विविध आघाड्यातील मान्यवर चेंबर ऑफ कॉमर्स व्यापारी आघाडी बांधकाम आघाडी वैद्यकीय आघाडी ,भुसार अडत आघाडी,यंत्रमाग आघाडी,या क्षेत्रातील मान्यवर तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते शक्ति केंद्रप्रमुख इतक्यांचे प्रमुख उपस्थिती होती
डॉक्टर्स ,डेंटिस्ट, पँरामेडीकल, फार्मसिस्ट आरोग्य सेवक केमिस्ट बांधव इत्यादी मान्यवर यावेळेस उपस्थित होते
*याप्रसंगी या डॉक्टर अजित गोपछडे यांनी अर्थसंकल्पीय 2023 च्या विविध विषयांमध्ये अत्यंत सखोल असं मार्गदर्शन करून सदर अर्थसंकल्प हा महिला, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग, युवक, आदिवासी, दलित, ओबीसी, वंचित या सर्वांसाठी कसा सर्व समावेशक आहेत
तसेच शेतकरी कर्ज माफी, पीकविमा, जलयुक्त शिवार, हर घर जल जनजीवन मिशन, लेक लाडकी, शाश्वत शेती , युवा रोजगार निर्मिती, मागेल त्याला शेततळे, गोसेवा गो संवर्धन , श्री अन्न अभियान, नैसर्गिक व सेंद्रीय शेती, पर्यावरण पुरक विकास, मराठवाड्यातील वाॅटर ग्रीड, महात्मा फुले जन आरोग्य योजना, नदी जोड प्रकल्प, सोर उर्जा , आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका मानधन वाढ, महिलांसाठी शक्ती सदन,14 जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये, विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढ, सिंचन प्रकल्प, रस्ते विकास , मेट्रो प्रकल्प, सर्व समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे, दिव्यांग विकास, नागरिक सुरक्षा व पर्यटन विकास इत्यादी विषयांवर अत्यंत सखोल असे मार्गदर्शन याप्रसंगी डॉ.अजित गोपछडे.संयोजक भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी केले
यावेळी शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी बोरामणी सरचिटणीस शशी भाऊ थोरात,कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण कांबळे, माजी महापौर श्रीकांचन्ना यन्नम, नगरसेविका वड्डेपल्ली, भूपती कमटम, दीनानाथ धुळम अंबादास बिंगी, चिटणीस अनिल कंदलगी, नागेश सरगम, बाबूराव संगेपांग, राम वाकसे, दत्ता पाटील, रवि भवानी, नागेश पासकंटी, मनोज कलशेट्टी, संदीप कुलकर्णी, श्रीनिवास पुरुड, श्रीनिवास करली, वैभव बिराजदार, यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटाप्पा गड्डम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स जिल्हा समन्वय केतनशहा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर राजेश फडकुले, गणेश पेनगोंडा, अशोक गडहिरे, सुधाकर नराल. सुनिल गौडगांव, अविनाश बेंजरपे, संतोष कदम, शिवशरण बब्बे, डॉक्टर सचिन डोंगरगे तसेच सर्व मंडल पदाधिकारी सर्व आघाडीचे प्रमुख पदाधिकारी इत्यादींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन सुजित चौघुले यांनी केले प्रास्ताविक रुद्रेश बोरामनी यांनी केले व आभार प्रदर्शन नागेश सरगम यांनी केले.