Home Breaking News आझाद नगर परिसरात घरात घुसून काठीने मारहाण केल्याप्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

आझाद नगर परिसरात घरात घुसून काठीने मारहाण केल्याप्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

491

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: येथील आजाद नगर परिसरात जळगाव जामोद येथील चौघांनी घरासमोर येऊन शिवीगाळ आणि घरात घुसून काठीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख नसीर शेख तालीम वय 47 वर्षे राहणार आझाद नगर यांनी शहर पोलीस स्टेशनला आज तक्रार दिली की ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत असून त्यांच्या मुलीचा घरगुती वाद असल्याने त्यांना फोन करून सांगितले की तुम्ही येऊन मुलीला घेऊन जा असे सांगितले यावरून जळगाव जामोद येथील अमीर खान मज्जिद खान, मुकखार खान आमिर खान, बबन आमिर खान व इक्बाल खान आमिर खान यांनी घरासमोर येऊन शिवीगाळ केली

व घरामध्ये येऊन चौघांनी काठीने मारहाण करून जखमी केले व जीवाने मारण्याची धमकी दिली अशा तक्रारी व मेडिकल सर्टिफिकेट वरून कलम 452 324 504 506 34 भादवी नुसार पुन्हा दाखल करण्यात आला आहे

Previous articleनिमित्त अभिष्टचिंतन आणि ओळख कर्तृत्ववान युवकाची विठ्ठल शेषराव अवताडे
Next articleमहिन्याभरापूर्वी गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गौलखेड येथील आरोपी विरुद्ध