Home Breaking News महिन्याभरापूर्वी गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गौलखेड येथील...

महिन्याभरापूर्वी गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गौलखेड येथील आरोपी विरुद्ध

807

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये,पोस्को, ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल..

शेगाव : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी महिन्याभरानंतर ग्रामीण पोलिसांनी पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोस्को ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हादाखल केला आहे, याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडीतीने आज शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की 14 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी साडे बारा वाजे दरम्यान मी औषधी च्या गोळ्या आणण्याकरिता जात असताना गौलखेड येथील गणेश प्रल्हाद शेजोळे यांने मलाआवाज दिल्याने काय म्हणता असे विचारले असता.

आरोपीने माझे तोंड दाबून घरामध्ये नेले व दरवाजाला आतून कळी लावून जबरदस्तीने दोन गोळ्या मला दिल्याने मला गुंगी आली आणि गुंगी मध्ये आरोपीने अत्याचार केला यावेळी आरोपीने म्हटले की कोणाला काही सांगू नको सांगितले तर मी तुझ्या बहिणीचे व मावशीचे लग्न होऊ देणार नाही व तुझे जीवन खराब करीन असे म्हणून जीवाने मारण्याची धमकी दिली यामुळे पीडिता घाबरून गेल्याने झालेली घटना कोणालाही सांगितली नाही.

तर आज याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी गणेश प्रल्हाद शेजोळे विरुद्ध कलम 376 (१), 354 328 342 506 भादवी सह कलम 4,12 पोस्को सह कलम 3(1),w(I)(ii)3(2) (VA)(3)(2)(5) अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर साहेब करीत आहेत.

या घटनेमुळे गौलखेड गावात एकच खळबळ निर्माण झालेली दिसत आहे

Previous articleआझाद नगर परिसरात घरात घुसून काठीने मारहाण केल्याप्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल
Next articleबुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावर यावल ते साकळी व किनगाव रस्त्याची खड्डयांमुळे दयनिय अवस्था