Home वर्धा नवनियुक्त ठानेदार सोनुने यांनी स्विकारला पदभार

नवनियुक्त ठानेदार सोनुने यांनी स्विकारला पदभार

536

 

सिंदी रेल्वे ता.२४ : नवनियुक्त पोलीस निरीक्षक वदंना सोनुने यांनी मावळते पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या कडुन गुरुवारी (ता.२३) सायंकाळी सिंदी रेल्वे ठाण्याचा पदभार स्वीकारला.

या प्रसंगी सिंदी रेल्वे येथुन सेवाग्राम पोलीस ठाणेदारपदी बदली झालेले चंद्रशेखर चकाटे यांनी नवनियुक्त ठानेदार वंदना सोनुने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आणि सोनुने यांना त्यांच्या पहिल्या ठानेदारपदाच्या पुढील कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उप पोलीस निरीक्षक राजु सोनपितळे, माजी नगरसेवक सुनील बोंबले, पत्रकार मोहन सुरकार तसेच सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे शिस्तप्रीय सोनुने मॅडम या अगोदर सुध्दा सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात कोरोना काळात उप पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे येथील सर्व बाबीशी त्या परिचित असुन शहरातील नागरीक सुध्दा त्यांच्याशी व त्यांच्या कार्याशी परिचीत आहे

Previous articleतानाजी कुऱ्हाडे यांची भारतीय लोकशक्ती पक्ष महाराष्ट्रराज्य अध्यक्षपदी निवड
Next articleकिनगाव चुंचाळे रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तिचा र्निघुण खून परिसरात एकच खळबळ पोलीस घटनास्थळी दाखल