Home Breaking News जवेरिया अनम मोहम्मद तनवीर याचा पहिला रोजा उत्साहात संपन्न!!

जवेरिया अनम मोहम्मद तनवीर याचा पहिला रोजा उत्साहात संपन्न!!

288

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव मुस्लिम बांधवासाठी पवित्र असलेला रमजान महिना सध्या सुरु आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजे उपवास ठेवतात. मुस्लिम समाजात ‘रोजा’ ला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण मन आणि शरीर शुद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे.

आजच्या या कठीण काळातही माणसाला निरोगी आणि चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो. रोजा ठेवणे म्हणजे अन्न पाण्याविना दिवस काढणे. अशात उन्हाळ्यात रोजा ठेवणे अतिशय कठीण आहे. तरीही येथील जवेरिया अनम मोहम्मद तनवीर या फक्त ६ वर्षाच्या चिमुकलीने जीवनातला पहिला रोजा ठेवला.

पहाटे ४.३७ वाजेपासून ते सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत उपाशी पोटी राहून (अल्लाह) ईश्वर प्रति आपली श्रध्दा व्यक्त करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणूनच एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण केल्याबद्दल ६ वर्षाच्या जवेरिया अनमचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Previous articleकासवा , अकलुद ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्याकडुन शासकीय कामात अडथळा निर्माण करून ग्रामसेवकास मारहाण पोलीसात गुन्हा दाखल
Next articleमूर्तिजापूर शहरात पोलिसांचे पथसंचलन..!