Home बुलढाणा महाराष्ट्र मराठा सोयरीक समाज बांधवांसाठी नवक्रांती देणारी ठरली..

महाराष्ट्र मराठा सोयरीक समाज बांधवांसाठी नवक्रांती देणारी ठरली..

116

 

वधु वर परिचय मेळाव्यातून उपजातींना बगल देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला…

हजारो वधू-वरांनी परिचय मेळाव्यात उपस्थिती दर्शविली..

बुलढाणा
महाराष्ट्र मराठा सोयरीक अंतर्गत मराठा वधु वर परिचय मेळाव्यात एक हजार च्या पुढे वधू-वरांनी घेतला सहभाग. मराठा समाजातील सर्व उपजाती बाजूला सारून महाराष्ट्र मराठा सोयरीकची नवक्रांती व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे मत संस्थापक सुनील जवंजाळ व ऍड सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले.

आज दोन एप्रिल रोजी स्थानिक बुलढाणा शहरातील गर्दे हॉलमध्ये मराठा वधु वर परिचय सोयरीक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र मराठा सोयरीक च्या वतीने मराठा समाजातील सर्व उपजातींच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन सकाळी दहा ते पाच दरम्यान करण्यात आले होते. यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज बांधव आपल्या उपजाती बाजूला सारून बहुसंख्येने प्रथमच एकत्र आले होते.

बुलढाणा शहरातील जिल्हास्तरीय वधू वर परिचय मेळाव्याच्या यशस्वी आयोजनानंतर यापुढे तालुकास्तरावर वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रामुख्याने वधु वर परिचय मेळाव्याला भेट देत शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक सुनील जवंजाळ,अँड सतीशचंद्र रोठे, डॉ. मनोहर तुपकर सुरेखाताई सावळे, संजीवनीताई शेळके, यांच्यासह सर्वच आयोजन समितीचे सदस्य तथा बहुसंख्य मराठा समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
———————————–

Previous articleमहापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेने गावात तणावाचे वातावरण परिस्थिती नियंत्रणात
Next articleअट्रावल येथे पुतळा विटंबणा दंगल प्रकरणी २o५ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल १५ जणांना पोलीसांनी केली अटक