Home Breaking News अट्रावल येथे पुतळा विटंबणा दंगल प्रकरणी २o५ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल १५...

अट्रावल येथे पुतळा विटंबणा दंगल प्रकरणी २o५ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल १५ जणांना पोलीसांनी केली अटक

607

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी दहा ते साडेदहा वाजेचे सुमारास दोन गटात झालेल्या हाणामारीत घटाकडील सुमारे १०ते १२ जण जखमी झाले होते या प्रकरणी दोन्ही गटासह शासनाचे वतीने पोलीस उपनिरिक्षक सुनीता मारूती कोळपकर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक रमेश बाविस्कर अशा चार फिर्यादी दाखल झाल्या असून चारही फिर्यादीनुसार २o५ आरोपीं विरुद्ध विविध कलमासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक करत लाठ्या- काठ्या चा वापर करून, तुंबळ हाणामारी झाली होती यात दहा जण जखमी झाले होते

या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गटाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एका गटाकडून ५७ तर दुसऱ्या गटाकडून ५१ यासह पोलीस प्रशासनाच्या वतीने फौजदार सुनीता कोळपकर यांनी दिलेल्या फिर्यादीत ९३ व पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ०४ अशा चार फिर्यादीनुसार २०५ आरोपींवर विविध कलमान्वये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यात प्रशासन व दोन्ही गटाकडून दिलेल्या फिर्यादीतील काही संशयित आरोपींची नावे समान आहेत . रविवारी सकाळपर्यंत पंधरा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांची धरपकड अद्यापही सुरूच आहे.

अट्रावल गावात तणावपूर्ण शांतता

शनिवारी सायंकाळपर्यंत पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी फैसपुर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे गुन्हा अन्वेषण चे कोणी किसन नजन पाटील हे तळ ठोकून होते. रविवारी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांचे सह फैजपुर सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर अविनाश दहिफळे यांचे सह दंगल विरोधी पथक व पोलीस ताफा मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. या ठिकाणी काल प्रशासनाच्या वतीने पोलिस अधिक्षक एम राजकुमार यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणुन बसविला. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन पत्रकारांशी बोलतांना फैजपुर चे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ . कुणाल सोनवणे यांनी केले आहे .

Previous articleमहाराष्ट्र मराठा सोयरीक समाज बांधवांसाठी नवक्रांती देणारी ठरली..
Next articleग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कोळशी येथे संपन्न