Home अकोला मूर्तिजापूर शहरात 4 एप्रिल रोजी स्वा. वि.दा. सावरकर गौरव यात्रा..!

मूर्तिजापूर शहरात 4 एप्रिल रोजी स्वा. वि.दा. सावरकर गौरव यात्रा..!

199

 

मूर्तिजापूर:- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबाबत काँग्रेस पक्षाकडून होत असलेला अपमान बघता सर्वसामान्य जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी 30 मार्चपासून राज्यातील 288 मतदार संघात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.

मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिर येथून सायंकाळी 5 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र चळवळीतील योगदानाची माहिती देणारे चित्ररथ व पालखी सह स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले

असून सदर गौरव यात्रा श्री स्वामी समर्थ मंदिर येथून सायंकाळी पाच वाजता सुरु होऊन सायंकाळी 7 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रख्यात व्याख्याते, स्वातंत्रवीर सावरकर विषयांचे गाडे अभ्यासक राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प योगेश महाराज साळेगावकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर गौरव रथयात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयक त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देणारे चित्ररथ, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पालखी आदींची माहिती देणारे देखावे असणार असल्याची माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मुर्तीजापुर चे अध्यक्ष अॅडव्होकेट पवन पांडे यांनी बोलतांना सांगितले.

मुर्तीजापुर येथील भक्तीधाम मंदिर येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रथयात्रेचे नियोजन बैठक संपन्न झाली.

यावेळी अॅडव्होकेट पवन पांडे, आमदार हरीश पिंपळे, प्रा. दिपक जोशी,सतीश शर्मा, अभय पांडे, अनिल जेठावानी,अमितशास्त्री कंझरकर, प्रतिक कुऱ्हेकर, शाम वाळस्कर,संजय उर्फ भुरा सेठ तिवारी, श्रीकांत जोशी,कमलाकर गावंडे, रितेश सबाजकर,सुधीर दुबे, योगेश फुरसुले,पप्पू पाटील मुळे, अमित नागवान, संतोष माने,राहुल गुल्हाने, निक्की महाजन, दीपक गुप्ता, सुभाष ठाकूर,अर्पित गावंडे, श्याम देवगीरकर, बादशाह आदींची उपस्थिती होती.
———————
कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतिनिधी प्रतीक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्यूज अकोला.

Previous articleव्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती
Next articleमधमाशांच्या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी